सातारा - महाराष्ट्रातील महिला अत्याचाराच्या घटना दिवासागणिक भीषण होत आहेत. आता सातारा जिल्ह्यातून अशीच एक महिला अत्याचारासंबंधी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील महाबळेश्वर परिसरात राहणाऱ्या एक अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महाबळेश्वर नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते डी. एम. बावळेकर यांच्या दोन मुलांना अटक कऱण्यात आली आहे.
महाबळेश्वरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षाच्या दोन मुलांसह ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर अत्याचाराला वाचा फुटली. महाबळेश्वर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सागर उर्फ आबा हनुमंत गायकवाड (वय -३० वर्ष) आणि आशुतोष मोहन बिरामणे (रा. महाबळेश्वर) यांना ताब्यात घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
या दोघांना सातारा येथील जिल्हा विशेष सत्र न्यायालयाकडून २७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर गुरुवारी या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये महाबळेश्वर नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते डी. एम. बावळेकर यांचे दोन सुपुत्र सनी बावळेकर आणि योगेश बावळेकर यांचादेखील समावेश असल्यामुळे महाबळेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे.