पंजाब पोलिसांनी उधळला दहशतवादी हल्ल्याचा कट

शस्त्र आणि स्फोटकांसह ३ दहशतवाद्यांना अटक

    23-Sep-2021
Total Views | 67

Punjab_1  H x W
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये ६ दहशतवादी पकडले गेल्याची घटना ताजी असतानाच आता पंजाबमध्येही ३ दहशतवादी पकडले गेले आहेत. या दहशतवाद्यांकडून काही हत्यारे आणि स्फोटके मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. पंजाब पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दहशतवादी कारवायांना वेळीच आळा घालण्यात यश मिळाले. पंजाबच्या तरनतारण जिह्यामध्ये घातपात घडवून आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या या तीन दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण क्षेत्राला घेराव घालत शोध मोहीम सुरू केली आहे.
 
 
तरणतारणचे एसएसपी उपिंदरजीत सिंग घुमान यांनी याबाबत सांगितले की, "भिखीविंद पोलीस स्थानकाचे प्रभारी निरीक्षक नवदीप सिंग भट्टी हे रात्री त्यांच्या टीमसह गस्तीवर होते. जिल्ह्यातील भगवानपुरा गावाजवळ पोलिसांनी संशयावरून एका कारला थांबवले. त्यात हे तिघे होते. तसेच, कारच्या झडतीमध्ये ९ एमएम पिस्तूल, ११ काडतुसे, एक विदेशी हातबॉम्ब आणि स्फोटके जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान दहशतवाद्यांनी मोठा घातपात करण्याच्या तयारीत असल्याचे उघड केले.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121