मुंबई : अंधेरीतील साकिनाका बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. मात्र, या प्रकरणाबद्दल महाविकास आघाडीतील महिला नेत्या, कार्यकर्त्या चिडीचूप आहेत. दरम्यान, सतत प्रत्येक गोष्टींवर बारीक 'लक्ष्य' ठेवणाऱ्या पत्रकार प्रसन्न जोशी यांना लेखिका शेफाली वैद्य यांनी एक टोला लगावला आहे. साकीनाका बलात्कार प्रकरणावर तुम्ही काही बोलणार आहात का, असा प्रश्न त्यांनी जोशी यांना विचारला आहे.
लेखिका शेफाली वैद्य म्हणाल्या, "प्रसन्न जोशी, पुण्यात १४ वर्षाच्या मुलीवर १३ नराधमांनी बलात्कार केले, सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला गेला, मुंबईत साक़ीनाका येथे २७ वर्षाच्या महिलाचा बलात्कार आणि खून झाला. चाय-बिस्किट पत्रकारांकडून एकही प्रतिक्रिया नसावी हे गृहीतच! पण तुम्हाला महाराष्ट्राबद्दल काय वाटतं?"
हाथरस बलात्कार प्रकरणी दिली होती प्रतिक्रीया
"हे योगी...ज्या महाराजांचं नाव तुम्ही परवा घेत होतात, त्यांचा आदर्श गिरवाल, अशी अपेक्षा आहे! बाकी, भक्तांकडून एकही प्रतिक्रिया नसावी हे गृहीतच! कंगनाला, तेजस्वी सूर्याला उत्तर प्रदेशबद्दल काय वाटतं ते जाणून घ्यायला आवडेल...", असा प्रश्न त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या हाथरस बलात्कार प्रकरणी २९ सप्टेंबर २०२० रोजी विचारला होता. नेमकं त्याच ट्विटला प्रत्युत्तर देत शेफाली वैद्य यांनी प्रश्न विचारला आहे.
राज्याला गृहमंत्री आहेत का ?
मुंबई आणि पुणे ही दोन शहरे राहण्याच्या दृष्टीने सुरक्षित मानली जातात. आज काय परिस्थिती आहे? पुण्यात सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याला पळवून नेण्यात आले, पुण्यात १४ वर्षीय महिलेला १३ जणांनी पळवले. साकीनाका, मुंबईत २७ वर्षीय महिलेची हत्या आणि हत्या. सर्व गेल्या तीन दिवसात घडल्या. महाराष्ट्राला गृहमंत्री आहेत का?, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.