केरळमध्ये काँग्रेसचं दहशतवादी कनेक्शन ? : एनआयएचा छापा

    06-Aug-2021
Total Views |

Keral _1  H x W
 
 
कोच्ची : जम्मू काश्मीरमध्ये सक्रीय दहशतवादी संघटना आयएसला केरळहून फंडींग मिळत असल्याचा धक्कादायक खुलासा एनआयएनं केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात काँग्रेसच्या नेत्याचा हात असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. केरळ ISIS मॉडेल प्रकरणात तपासानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) काश्मिर आणि कर्नाटकमध्ये छापे टाकले. त्यात ISIS समर्थक दहशतवादी संघटना जम्मू काश्मीरमध्ये इस्लामिक स्टेट संस्थाना निधी पुरवत असल्याचे उघड झाले आहे.
 
 
बंदीपोरा भागात काही संशयित ISIS या दहशतवादी संघटनेसाठी निधी गोळा करत होते. माजी काँग्रेस आमदार बीएम इदिनब्बा यांच्या नातवाला या प्रकरणात मंगळूरूहून अटक करण्यात आली आहे. अम्मर अब्दुल रेहमान (वय ३५) याचे केरळ मॉडेल इस्लामिक स्टेट कनेक्शन असल्याचे एनआयएनं म्हटले आहे.
 
 
रेहमानच्या भाचीनं एकूण कसारगोडचे १३ रहिवासी २०१६मध्ये देश सोडून दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी गेले. या प्रकरणात २०१७ मध्ये एनआयएनं चार्जशीट दाखल केली. एनआयएनं उल्लेख केल्यानुसार, अजमला आणि तिचा पती शिफास के. पी. या दोघांनी २४ मे २०१६ रोजी बंगळुरूमार्गे अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात गेले आणि आयएसमध्ये स्थायिक झाले. तर सुत्रांच्या माहितीनुसार, अजमला हल्ल्यात ठार झाली असावी एकूण २१ जणांनी केरळ सोडले.
 
 
रहमान आणि एनआयएनं बुधवारी बंगळुरूचे रहिवासी मदेशा एस पी उर्फ अली मुविया (२२) आणि काश्मीरचे ओबेद हमीद आणि मुझम्मिल हसन भट यांना अटक केली. एनआयए रहमानच्या ३३ वर्षीय पत्नी आणि तीन मुलांच्या आईचीही चौकशी करत आहे. केरळच्या मल्लपूरम येथून मोहम्मद अमीन या संशयितालाही अटक करण्यात आली होती. त्याच्यावर जिहादी आणि कट्टरपंथी विचारधारा प्रचारासाठी टेलिग्राम आणि इन्स्टाग्राम चॅनल चावविल्याचा आरोप आहे.
 
 
दरम्यान, क्रॉनिकल फाऊंडेशनच्य नावाने चालवल्या जाणाऱ्या इन्स्टाग्राम चॅनलद्वारे तरुणांना यात गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या चॅनलचे पाच हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. याचद्वारे तरुणांना शसस्त्र जिहाद आदींसारखे प्रशिक्षण दिले जाते. एनआयएतर्फे टाकण्यात आलेल्या छापेमारीत (NIA) दहशतवादी संघटनेचे काँग्रेसी कनेक्शन उघड झाले आहे. काँग्रेसचे माजी आमदार बीएम इदिनब्बा यांच्या घरावरही एनआयएनं छापा टाकला. इदिनब्बा यांचं २००९ मध्ये निधन झाले आहे. मात्र, एनआयएनं केलेल्या आरोपांनुसार, काँग्रेसच्या माजी आमदाराचा मुलगा आणि सून ISIS चे सदस्य आहेत.
 
माजी आमदाराच्या मुलाचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. विशेष म्हणजे त्यानंच इन्स्टाग्राम अकाऊंट फॉलो केल्यामुळे संशय आणखी बळावला. एनआयएनं संशयित मोहम्मद अमीन, मुशाद अनुवर आणि डॉ. रहीस यांना अटक केल्यानंतर खटला दाखल केला होता. बुधवारी टाकलेल्या छाप्यानंतर चौकशी करण्यात आली. या छाप्यात काही डेटा आणि विशेष पुरावेही गोळा करण्यात आले आहेत.
 
 
 
चौकशीनंतर कर्नाटक आणि काश्मिरहून प्रत्येकी दोन जणांना अटक करण्यात आली होती. एनआयएच्या आरोपांनुसार, अमीन हा केरळच्या मलप्पुरमचा रहिवासी आहे. तसेच दहशतवादी गटाचा प्रमुख होता आणि ISIS मीडिया नेटवर्कमध्ये सक्रीय होता. अफगानिस्तानातील खुरासानमध्ये IS च्या हस्तकांच्याही संपर्कात होता. दक्षिणपंथी समर्थक आणि माध्यम संस्थांना निशाणा करण्याची तयारी केली जात होती. एनआयएच्या आरोपांनुसार, दहशतवाद्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांना अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात पाठविण्याची तयारी केली जात होती.