दादा हाडप गुरुजी यांचे निधन

दादा हाडप गुरुजी यांचे निधन

    26-Aug-2021
Total Views | 154

ama  _1  H x W:



अंबरनाथ : ज्येष्ठ नागरिक दत्तात्रेय चिंतामण उर्फ दादा हाडप गुरुजी (88) यांचे मंगळवार, दि. 24 ऑगस्ट रोजी अल्पकालीन आजाराने खासगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पणतू असा परिवार आहे. शिवकाळापासून प्रतापगडावरील तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील पूजेचा मान हाडप कुटुंबीयांकडे असून, हाडप गुरुजी यांनी ही सेवा अनेक वर्षे केली.
हाडप गुरुजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निकटवर्तीयांमधील एक होते. ‘जाणता राजा’ महानाट्याच्या प्रारंभी भवानीमातेचे होणारे पूजन त्यांच्या हस्ते करण्यात येत असे. नुकतेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले, त्यावेळी झालेल्या सोहळ्यामध्ये हाडप गुरुजी यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आशीर्वादपर मंत्रपठण केले होते.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121