नवी दिल्ली : तिसऱ्या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि संपूर्ण भारतीय संघ अवघ्या फक्त ७८ धावांवर सर्वबाद झाला. याचा पाठलाग करताना पहिल्या दिवशी इंग्लंडच्या सलामी जोडीने १२० धावांची नाबाद खेळी केली. जेम्स अँडरसन आणि क्रेग ओवरटन यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. तर ओली रॉबिन्सन आणि सॅम कुरेन यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. मात्र, भारतीय गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही.
भारतीय खेळाडू क्षेत्ररक्षण करत असताना इंग्लंडच्या प्रेक्षकांनी पुन्हा एकदा आपला उद्धटपणा सिद्ध केला. मोहम्मद सिराज सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना इंग्लंडच्या काही प्रेक्षकांनी त्यावर बॉल फेकला. हे पाहून कर्णधार विराट कोहलीला देखील राग अनावर झाला. त्यानंतर पुन्हा एकदा सिराजला काही प्रेक्षकांनी इंग्लंडच्या प्रेक्षकांनी यावेळी सिराजला इंग्लंडची धावसंख्या विचारून त्याला खिजवण्याचा प्रयत्न केला. पण सिराज त्यावेळी शांत बसला नाही. सिराजनेही उलट उत्तर देत इशाऱ्यांनी प्रेक्षकांना १ आणि शून्य असे हातवारे करून दाखवले. भारतीय संघ अजूनही या मालिकेत १-० अशा आघाडीवर आहे, हे सिराजने प्रेक्षकांना दाखवले.