भारतात धर्मांतरणासाठी पाकिस्तानातून 'फंडींग'!

    04-Jul-2021
Total Views | 120
pakistan _1  H




धर्मांतरासाठी पाकिस्तानी गुप्तचर संघटना ‘आयएसआय’चा अर्थपुरवठा




नवी दिल्ली :
‘सक्तवसुली संचालनालया’ने (ईडी) उत्तर प्रदेशातील धर्मांतर रॅकेटप्रकरणी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील विविध सहा ठिकाणी शनिवारी छापेमारी केली. यावेळी भारतभरात धर्मांतर घडविण्याविषयीची महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

उत्तर प्रदेश ‘एटीएस’ने काही दिवसांपूर्वी फसवणुकीने मुस्लीम धर्मांतर करणारी टोळी पकडली होती. प्रामुख्याने मूक-बधीर विद्यार्थ्यांना ही टोळी आपले लक्ष्य करत होती. धर्मांतरासाठी पाकिस्तानी गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ अर्थपुरवठा करीत असल्याचेही ‘एटीएस’ला प्राथमिक तपासात आढळले होते. त्या पार्श्वभूमीवर सदरप्रकरणी ‘ईडी’ने शनिवारी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील सहा ठिकाणांवर छापेमारी केली.


उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील ‘अल हसन एज्युकेशन अ‍ॅण्ड वेल्फेअर फाऊंडेशन’ आणि ‘गाईडन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटी’च्या कार्यालयांवर तसेच दिल्लीतील काही ठिकाणी छापेमारी केली. प्राप्त माहितीनुसार, धर्मांतर टोळीचा म्होरक्या मोहंमद उमर गौतमद्वारे या संघटना चालविल्या जात होत्या. बेकायदेशीर धर्मांतरे घडविण्यासाठी या संस्थांचा वापर केला जात होता.

छाप्यादरम्यान ‘ईडी’ला अनेक महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत. त्यामध्ये या संघटनांमार्फत संपूर्ण भारतभरात बेकायदेशीर धर्मांतरे घडविण्याच्या योजनेची माहितीही हाती लागली आहे. त्याचप्रमाणे धर्मांतरासाठी मिळालेली कोट्यवधी रुपयांच्या परदेशी देणग्यांचीही माहिती त्यात सापडली आहे.






अग्रलेख
जरुर वाचा
देशातील २५६ राष्ट्रीय स्मारकांवरील

देशातील २५६ राष्ट्रीय स्मारकांवरील 'वक्फ'चा मालकी हक्क संपणार!

Waqf Board Property : देशात २५६ राष्ट्रीय स्मारके अशी आहेत की ज्यांवर वक्फ आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआय या दोन्हींची दुहेरी मालकी आहे. परंतु नव्या वक्फ सुधारणा कायद्यानुसार, हा कायदा लागू झाल्यानंतर या राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फ बोर्डाचा दावा संपुष्टात येणार असल्याची माहिती एएसआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. यावर दैनिक भास्कर या वृत्तसंस्थेने ग्राउंड रिपोर्ट तयार केला आहे. या अहवालात राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फच्या दाव्यांविषयी एएसआय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन माहिती संग्रहित केली आहे. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121