टोकियो : टोकियो ऑलिम्पिक २०२१मध्ये भारतीय खेळाडूंची आत्तापर्यंत कामगिरी पाहता आणखी एका खेळाडूने अंतिम फेरी गाठत पदकाच्या आशा निर्माण केल्या आहेत. अनपेक्षितपणे, थाळीफेकमध्ये भारताची महिला थाळीफेकपटू कमलप्रीत कौरने अंतिम फेरी गाठली आहे. तीनही प्रयत्नात तिने ६० मीटरच्या वरची कामगिरी केली आहे. याचसोबत ग्रुप बीमध्ये दुसरे स्थान पटकावत तिने अंती फेरीत धडक दिली आहे.
ऑलिम्पिकमध्ये शनिवारी कमलप्रीत कौरने पहिल्या प्रयत्नात ६०.२९ मीटर, दुसऱ्या प्रयत्नात ६३.९७ मीटर आणि तिसऱ्या प्रयत्नात पुन्हा ६३.९७ मीटर अशी कामगिरी नोंदवली. दरम्यान, थाळीफेकपटू सीमा पुनिया मात्र सोळाव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. यामुळे तिला अंतिम फेरी गाठता आले नाही. टोकियो ऑलिम्पिकसाठी या वर्षीच्या मार्च महिन्यामध्ये पात्रता फेरी स्पर्धा खेळवण्यात आली. यामध्ये कमलप्रीत कौरने राष्ट्रीय विक्रम नोंदवला. तिने ६५ मीटर लांब थाळी फेकली. जून महिन्यात तिने तिचाच विक्रम मोडला. त्यावेळी तिने ६६.५९ मीटर लांब थाळी फेकली.