टोकियो : केनियाचा जगप्रसिद्ध धावपटु अबेल मुताई ऑलिम्पिक स्पर्धेत अखेरच्या राउंडमध्ये धावतांना अंतिम रेषेपासुन फक्त काही मीटर दूर होता. त्याचे सर्व प्रतिस्पर्धी मागे होते, अबेलने सुवर्ण पदक जिंकल्यातच जमा होते. सर्व प्रेक्षक त्याच्या नावांचा जल्लोष करत होते. तेवढ्यातच तो गैरसमजातून अंतिम रेषा समजून अंतिम रेषेच्या एक मीटर आधीच थांबला. त्याच्या मागुन येणाऱ्या स्पेनच्या इव्हान फर्नांडीसच्या लक्षात आले की, अंतिम चिन्ह न समजल्यामुळे तो अंतिम रेषेच्या आधीच थांबला आहे. त्याने ओरडुन अबेलला पुढे जाण्यास सांगितले, पण स्पॅनिश समजत नसल्याने तो पुढे गेला नाही. शेवटी इव्हानने त्याला ढकलुन अंतिम रेषेपर्यंत पोहचवले. त्यामुळे अबेलला सुवर्ण पदक मिळाले तर इव्हानला रौप्य पडका मिळाले.
या सर्व प्रकाराबद्दल पत्रकारांनी इव्हानला विचारले, "तू असे का केलेस? तुला संधी असतांना तू पहिला क्रमांक का घालवलास ?" तेव्हा याचे उत्तर देताना इव्हानने सांगितले की, "माझे स्वप्न आहे की एक दिवस आम्ही अशी मानव जात बनू जी एकमेकांना मदत करेल. मी पहिला क्रमांक घालवला नाही." पुढे पत्रकाराने त्याला विचारले की, "पण तू केनियन स्पर्धकाला ढकलुन पुढे आणलेस?" त्यावर तो म्हणतो की, "तो पहिला आलेलाच होता ही शर्यत त्याचीच होती !"
यावरून पुन्हा एकदा पत्रकाराने विचारले की, "पण तू सुवर्ण पदक जिंकू शकला असतास !" आणि त्यानंतरच्या उत्तराने इव्हानने सर्वांची मने जिंकली. तो म्हणाला, "त्या जिंकण्याला काय अर्थ होता ? माझ्या पदकाला मान मिळाला असता का ? माझी आई काय म्हणाली असती ? संस्कार हे पिढी दर पिढी पुढे पुढे जात असतात. मी पुढच्या पिढ्यांना काय दिले असते ?दुसऱ्यांच्या दुर्बलतेचा किंवा अज्ञानाचा फायदा न घेता त्यांना मदत करण्याची शिकवण माझ्या आईनी मला दिली आहे."