कोकण फक्त विकेंडला मजा करण्यासाठी नाही : भरत जाधव

    24-Jul-2021
Total Views | 122
 
bharat jadhav_1 &nbs
 
 
मुंबई : महाराष्ट्रात सध्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यासह कोकणामध्ये अनेक ठिकाणी नद्यांना पूर आले. यामध्ये चिपळूण, सांगली, कोल्हापूरला या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळून शेकडो लोकांना आपले जीव गमवावे लागले. अवकाळी आलेल्या या संकटांमुळे अनेक कुटुंब आता रस्त्यावर आले आहेत. अशामध्ये आता यांना मदतीसाठी हात पुढे करण्याची गरज असल्याचे आवाहन अभिनेता भरत जाधवने केले आहे.
 
 
 
 
कोकणमध्ये अनेक पर्यटनस्थळ आहेत. पर्यटक मोठ्या संख्येत तिथे फिरायला, सुटी घालवायला जातात, याचाच आधार घेऊन भरत जाधवने पोस्ट टाकली, “आपले कोकण हे फक्त वीकेंडला मजा करण्यापुरते नाही. या पूरसंकटात आपापल्या परीने शक्य ती कोकणाला साथ द्या.” या पोस्टमध्ये जास्त दिवस टिकतील असे सुके पदार्थ, किराणा सामान, महिला – पुरुषांना लागणारी सर्व प्रकारची कपडे, अंथरूण-पांघरूण म्हणून वापरता येणारी जाड कपडे अशा विविध प्रकारे मदत करण्यासाठीची माहिती यावर दिलेली आहे. सोबतच संपर्क क्रमांकसुद्धा दिले आहेत.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121