रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय स्थिरता अहवालाचा निष्कर्ष
मुंबई (सोमेश कोलगे): लसीकरणामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यास हातभार लागत असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय स्थिरता अहवालातून समोर आले आहे. नुकताच रिझर्व्ह बँकेने हा अहवाल प्रसिद्ध केला. देशातील बँक व एकूण आर्थिक परिस्थितीवर भाष्य करणारा हा अहवाल महत्वपूर्ण मानला जातो.
लसीकरणाच्या वाढत्या वेगामुळे अर्थव्यवस्थेला हातभार लागला असल्याचे अहवालातून दिसले आहे. तसेच एनपीए 7.5 टक्के असल्याचे समजते. त्यामुळे कोविड संकट असूनही 'एनपीए' बर्यापैकी नियंत्रणात आहेत असे म्हटले पाहिजे. या आकडेवारीमुळे देशाच्या अर्थविश्वाला सुखद धक्का बसला असे म्हटले पाहिजे. परंतु मार्च 2022 पर्यन्त अनुसूचीत विपरी बँकांचे 'एनपीए' सर्वसाधारण स्थितीत 9.80 टक्क्यांपर्यंत व कठीण परिस्थितित 11.22 टक्क्यांपर्यंत जाण्याशी शक्यता रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय स्थिरता अहवालाने व्यक्त केली आहे.
भारतासारख्या देशासाठी वाढत्या इंधन किमती धोकादायक ठरू शकतात. मात्र एकूण पैसापुरवठा वाढल्यास अर्थव्यवस्थेत सुधारना होऊ शकते. रिझर्व्ह बँकेने हा अहवाल गुरुवारी 1 जुलै रोजी जाहीर केला.