नवी दिल्ली : कंदाहार येथे भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांची हत्या झाली आहे. तालिबान-अफगाणी सैन्य यांच्यात झालेल्या संघर्षात सिद्दिकी यांचा बळी गेला आहे. दानिश सिद्दिकी हे ‘रॉयटर्स’ या परदेशी वृत्तसंस्थेशी संबंधित होते. अफगाणिस्तान येथे अफगाणी सैन्य आणि तालिबान यांच्यामधील संघर्षाचे वार्तांकन ते करीत होते. मात्र, कंदाहार येथे अफगाणी सैन्य आणि तालिबान यांच्यातील संघर्षामध्ये तालिबानने त्यांचीदेखील हत्या केली.