उज्जैन मध्ये सापडले हजार वर्षे जुन्या मंदिराचे अवशेष

    14-Jul-2021
Total Views | 172

ujjain_1  H x W


उज्जैन : मध्य प्रदेशच्या उज्जैन येथे महाकाल मंदिरच्या नजीक खोदकाम सुरू असताना सुमारे १००० वर्षे जुने मंदिराचे अवशेष सापडले आहेत.या खोदकामातुन आढळलेल्या परमार काळातली वास्तुकलाची अद्भुत कलाकृती सापडली आहे.हे खोदकाम महाकाल मंदिराच्या विस्तारासाठी केले जात होते. ३० मे २०२१ रोजी मंदिराच्या पुढील भागातून देवीची मूर्ती सापडली गेली होती.

 त्यानंतर खोदकाम प्रशासनाद्वारे काम स्थगित करण्यात आले होते. याची माहिती मिळाल्यानंतर, संस्कृती विभागाने आर्कियोलॉजी विभागाच्या चार अधिकाऱ्यांना मंदिराच्या निरीक्षणाचे काम पाहण्यासाठी पाठविले होते. मंदिराच्या उत्तरेकडील भागात ही रचना सापडल्याचे  चार अधिकाऱ्यांच्या संघाचे नेतृत्व करणारे डॉ. यादव यांनी सांगितले आहे. दक्षिणेस जमिनीपासून चार मीटर खाली एक २१०० वर्ष जूनी भिंतही सापडली आहे.
 
मंदिराचे बांधकाम कोणी केले हे अद्याप समजू शकलेले नाही, सध्या अभ्यास सुरू आहे. मंदिराची रचना संरेखित झाल्यानंतरच  निष्कर्षावर पोहोचता येईल. उज्जैन जिल्हाधिकारी आशिष सिंह म्हणाले आहेत की, "पुरातत्व अवशेष संवर्धन प्रयत्नांमुळे हे काम कमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,मंदिर संकुलाच्या खोदकामादरम्यान, मागील वर्षी हवन कुंड, चूलीसह इतर अनेक वस्तू सापडल्या. 

 आतापर्यंत केलेल्या उत्खननात, दगडी खांबाचे अवशेष, छताचा काही भाग, भाला इत्यादी वस्तू मंदिरात सापडल्या आहेत. यासह दोन हजार वर्ष जुन्या शुंगा व कुशान काळात बनवलेल्या मातीच्या बनविलेल्या सामग्रीचे अवशेषही सापडले आहेत.महत्त्वाचे म्हणजे यावर्षी जानेवारीत महाकाल मंदिराच्या विस्तारास हिरवा झेंडा दाखविण्यात आला. राज्यातील शिवराज सिंह सरकारने यासाठी ५०० कोटींची तरतूद केली आहे. डिसेंबर २०२० मध्ये फ्रान्सचे राजदूत आपल्या पत्नीसह महाकाल या मंदिराला भेट दिली. दर्शनानंतर त्यांनी जाहीर केले होते की फ्रेंच सरकार 'महाकाल मंदिर विकास योजना' साठी ८० कोटी रुपये देईल.




 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121