‘आरबीआय’कडून आकडेवारी जाहीर आगामी तिमाहीत महाराष्ट्र सरकारची २५ हजार कोटी कर्ज घेण्याची तयारी

    10-Jul-2021   
Total Views | 168

rbi_1  H x W: 0

 
मुंबई :  दि. ९ जुलै ते सप्टेंबर २०२१ या आर्थिक तिमाहीत तब्बल २५ हजार कोटी रुपये कर्जाऊ उभारण्याची राज्य सरकारची तयारी आहे. ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने (आरबीआय) विविध राज्य सरकारांशी सल्लामसलत करून अंदाजित आकडे जाहीर केले आहेत, त्यावरून ही माहिती समजते.

‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने शुक्रवार, दि. ९ जुलै रोजी याविषयीची आकडेवारी जाहीर केली. विविध राज्यांनी रिझर्व्ह बँकेकडे कर्ज घेण्याविषयीच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याची तयारी दर्शवून ‘आरबीआय’ला कळवलेल्या अंदाजे आकडेवारी नुसार ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. आगामी तिमाहीसाठीच्या या कर्जवाटप प्रक्रियेचे वेळापत्रक आरबीआयने जाहीर केले. महाराष्ट्रासह यामध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश व अन्य काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा कर्ज घेण्याच्या प्रक्रियेत सहभाग असणार आहे.
दि. १३, १९, २७ जुलै व दि. ३, १०,१७,२४,३१ ऑगस्ट, तर दि. ७,१४,२१,२८ सप्टेंबर असे या कर्ज घेण्याच्या प्रक्रियेचे साप्ताहिक टप्पे असतील. महाराष्ट्राकडून विविध टप्प्यात २०००, २५०० व १५०० कोटी अशा रकमांचे कर्ज घेण्यात येणार असल्याची शक्यता असून एकूण आकडा २५ हजार कोटींचा आहे.कर्जवाटपाच्या प्रत्येक टप्प्यावर तेव्हाची आर्थिक परिस्थिती, तसेच राज्य सरकारची गरज या सगळ्यानुसार प्रत्यक्षात राज्याने किती रक्कम कर्जाऊ घेतली आहे, याचे आकडे जाहीर केले जातील, असे ‘आरबीआय’ने म्हटले आहे. तसेच भारतीय संविधानाच्या ‘कलम २९३(३)’ अन्वये राज्य सरकारांनी केंद्र सरकारकडून संबंधित रकमेची परवानगी घेणे गरजेचे असते.




सोमेश कोलगे 

महविद्यालयीन विद्यार्थी आहे. महाराष्ट्रातील नावाजलेल्या वक्तृत्व, वादविवाद स्पर्धांतून सहभाग आणि प्राविण्य संपादन केले आहे. कायदा, न्यायशास्त्र विषयाची विशेष आवड.  संघाचा स्वयंसेवक . विविध विधायक कारणांसाठी न्यायालय तसेच  महिला आयोग, ग्राहक मंच अशा अर्ध-न्यायिक संस्थांकडे जनहितार्थ याचिका.  माहिती अधिकार, २००५  आणि तत्सम अधिकारांचा सकारात्मक उपयोग.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121