यूपीत जबरदस्ती मुस्लिम धर्मांतर करणारी टोळी पकडली

    21-Jun-2021
Total Views | 76

UP_1  H x W: 0
- आतापर्यंत १ हजाराहून अधिक जणांचे धर्मांतरण
- मुक-कर्ण बधिरांसह लहान मुले आणि महिला लक्ष्य
- मोहंमद उमर गौतम आणि जहाँगिर आलम अटकेत, आयएसआयचे अर्थसहाय्य
नवी दिल्ली, २१ जून, (विशेष प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशात १ हजारांहून अधिक जणांचे जबरदस्ती मुस्लिम धर्मात धर्मांतरण घडविणारी टोळी उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पकडली आहे. लहान मुले, महिला आणि मुक बधिरांना लक्ष्य करून त्यांना मुस्लिम बनविणाऱ्या मोहंमद उमर गौतम आणि जहाँगिर आलम या दोघांना एटीएसने अटक केली आहे. यामध्ये आयएसआयचे अर्थसहाय्य असल्याचेही तपासात पुढे आले आहे.

उत्तर प्रदेश एटीएस आणि उप्र कायदा व सुव्यवस्था – अपस पोलिस महानिरिक्षक प्रशांत कुमार यांनी सोमवारी पत्रकारपरिषदेत या प्रकरणाचा खुलासा केला. ते म्हणाले, राज्यात पैशाचे आमिश दाखवून आणि जबरदस्तीने बिगरमुस्लिमांना मुस्लिम केले जात असल्याची काही प्रकरणे समोर आली होती. त्याचे गांभीर्य ओळखून एटीएसने या प्रकरणाचा तपास करण्यास प्रारंभ केला होता. याप्रकरणी प्रथम विपुल विजयवर्गिय आणि कासिफ या दोघांना अटक करण्यात आली होती, त्यांची चौकशी केली असता मोठी टोळी याकामी कार्यरत असल्याचे पुढे आले होते. त्याचप्रमाणे त्यांनी उमर गौतम याचे नाव आपल्या जबानीत घेतले होते. मोहंमद उमर गौतम यानेही मुस्लिम धर्म स्विकारला असून त्यानंतर त्याने बळजबरी धर्मांतराचे काम सुरू केले होते. यासाठी त्यांना इस्लामिक दावा सेंटरची मदत होत असे, त्याचप्रमाणे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय याकामी अर्थसहाय्य करीत असल्याचेही समोर आल्याचे प्रशांत कुमार यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशातील चार जिल्ह्यांमध्ये टोळी सक्रिय
याप्रकरणी एटीएसने लखनऊ येथे खटला दाखल केला होता, त्याआधारे दोन जणांना अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे नोएडा, कानपुर, मथुरा, वाराणसीसह अन्य जिल्ह्यांमध्ये ही टोळी सक्रिय होती. यासाठी एक मुस्लिम धार्मिक संस्था स्थापन करण्यात आली होती. मोहंमद उमर गौतम आणि त्याचे साथिदार जामियानगर येथे एक संस्था चालवितात. त्या संस्थेता मुळ उद्देश हा बिगरमुस्लिमांना मुस्लिम करणे हा आहे. त्यासाठी या संस्थेच्या बँक खात्यामध्ये हवाला व अन्य मार्गांनी मोठ्या प्रमाणावर पैसा जमा केला जात असल्याचे एटीएसच्या तपासात पुढे आले आहे. मोहंमद गौतम उमर याने आतापर्यंत १००० हून अधिक लोकांना मुस्लिम केल्याचे आणि त्यांचे मुस्लिमांसोबत लग्न लावून दिल्याचे आपल्या जबाबात सांगितले आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश व अन्य राज्यांमधील बिगरमुस्लिम मुलींना मुस्लिम बनविणे आणि त्यांचे मुस्लिमांसोबत लग्न लावून देण्याचेही प्रकार ही टोळी करीत असल्याचे समोर आले आहे.
मुक-कर्ण बधिर होते लक्ष्य
उत्तर प्रदेशातील नोएडा येथील सेक्टर ११७ मध्ये नोएडा डेफ सोसायटी हे कर्ण बधिरांसाठीचे निवासी विद्यालय आहे. येथील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी आणि लग्नाचे आमिश दाखवून या टोळीने त्यांना मुस्लिम करून घेतले आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचे माता –पिता व अन्य कुटुंबियांना त्यांच्या मुलांचे धर्मपरिवर्तन झाल्याचे सांगितले जात नाही. दिव्यांगांच्या हतबलतेचा फायदा घेऊन ही टोळी आपल्या मुस्लिम धर्मांतराचे ध्येय साध्य करीत असल्याचे तपासात समोर आले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121