श्रीराममंदिराचा अपमान सहन केला जाणार नाही ! : भाजयुमो

    16-Jun-2021
Total Views | 107

tajindar tiwana_1 &n


श्रीराममंदिराचा अपमान सहन केला जाणार नाही ! भाजपचा शिवसेना भवनावर फटकार मोर्चा


मुंबई :
अयोध्या राम मंदिर बांधण्यासाठी होत असलेल्या भूसंपादनबाबत खोटे आणि बनवत आरोप केले जात असल्याचा दावा करत भाजप युवा मोर्चाने थेट शिवसेना भवनावर फटकार मोर्चा नेला.भाजप युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मात्र शिवसेना आमदार सदा सरवणकर हे शिवसैनिकांसह सेनाभवन परिसरात दाखल झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी या परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

राम मंदिरासाठी जगभरातून शेकडो कोटींचा निधी येत आहे. प्रभू रामचंद्राच्या नावाने एकही घोटाळा व्हायला नको. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये भाजपशी संबंधित सदस्य आहेत. शिवसेनेचा एकही सदस्य नाही. रामभक्तांच्या श्रद्धेला तडा जाईल असे काही घडू नये ही अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचे संशायस्पद प्रकरण समोर आले आहे. ते खरं की खोटं याचा लगेच खुलासा झाला तर बरं. ट्रस्टनं याबाबत खुलासा करायला हवा.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती.



मात्र यासर्व आरोपानंतर राम जन्मभूमी ट्रस्टने कराराचा सर्व तपशील सादर करत आरोपांचे खंडन केले आहे. अयोध्येत श्रीराम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप करून शिवसेना उर्फ ​​सोनिया सेनेने हिंदू धर्म, हिंदू धार्मिक स्थळ आणि हिंदूंच्या श्रद्धा आणि आस्था यांचा अपमान केला आहे. भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईतर्फे शिवसेनेच्या या शुल्लक राजकीय षडयंत्रविरोधात “फटकार मोर्चा” आयोजित करण्यात आला आहे, हा तीव्र निषेध भाजप शिवसेना भवन समोर करत आहे, असं भाजप युवा मोर्चाने म्हटलं आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121