नवी दिल्ली : भारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मला यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. रविवारी उपचारादरम्यान उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे ८५व्या वर्षी त्यांनी रुग्णालयात प्राण सोडला. निर्मला कौर सिंग या स्वतःही एक खेळाडू होत्या. मिल्खा सिंग यांच्या परिवाराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निर्मल कौर यांचे रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
निर्मला मिल्खा सिंग यांनी भारताच्या महिला व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधारपद भूषवले आहे. तसेच त्यांनी पंजाब सरकारच्या महिला क्रीडा संचालकपदीही काम पाहिले आहे. कुटुंबाने जारी केलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, "निर्मला कौर यांचे रविवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास निधन झाले. पती मिल्खा सिंग हे अतिदक्षता विभागात असून कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यामुळे त्यांना निर्मल कौर यांच्या अंतिम संस्कारात सहभागी होता आले नाही.