...अन्यथा, आम्ही उपोषण करू ; प्रवीण दरेकरांचा इशारा

    12-Jun-2021
Total Views | 71

Pravin Darekar_1 &nb
 
मुंबई : कांदिवली (पूर्व) भागातील वेगवेगळे पाडे, वस्त्या आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमधील नागरीकांच्या जीवीताची आणि सुरक्षिततेची काळजी घेऊन त्यांना मुलभुत सुविधा देण्याबाबतचा, त्यांचे पुनर्वसन करण्याचा संघर्ष अनेक वर्षांपासून सुरू आहे. गेल्या दीड वर्षापासून सातत्याने पत्रव्यवहार केला आहे, सभागृहातही वाचा फोडली आहे. पण, सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने नागरीकांच्या मनात असंतोष निर्माण झाला असून या समस्यांमधून सरकारने आणि वन विभागाने मार्ग काढला नाही. तर उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा शनिवारी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी कार्यकर्ते आणि या वस्त्यातील नागरिकांसह मुख्य वनसंरक्षक तथा संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांची भेट घेऊन त्यांना दिला. तसेच, एक निवेदन देखील दरेकर यांनी यावेळी वन अधिकाऱ्यांना दिले.
 
 
 
यावेळी माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले, "दामू नगर, भीम नगर, गौतम नगर, लहुगड, रामगड, सातारा कॅम्प, गांधी नगर, पांडे कंपाऊंड, जानू पाडा, कांदिवली पूर्व, केतकीपाडा, सवित्री बाई फुले नगर, राम नगर, शिवाजी नगर, वायंगणकर वाडी, महाराष्ट्र खदान, कानडे मैदान, दहिसर पूर्व तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाडे या परिसरातील नागरीकांच्या जीवीताचा, सुरक्षिततेचा आणि त्यांना मुलभुत सुविधा देण्याबाबतचा प्रश्न अनेक वर्षांपासून सरकारदरबारी मांडतो आहे. पण त्यामधून मार्ग निघालेला नाही. मालाड येथील इमारत दुर्घटना ताजी असतानाच, दहिसर पूर्व येथील केतकी पाडयामध्ये तीन घरे कोसळली. यामध्ये प्रद्युम्न सरोज नावाच्या २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या सर्व पाड्यातील आणि वस्तीतील लोक आजही जीव मुठीत घेऊन राहत आहेत."
 
 
 
"या ठिकाणी पाणी माफिया आणि वीज माफिया या गरिबांची लूट करीत आहेत. या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. परंतु, मूलभूत सुविधा देण्याचा आणि त्यांचे पुनर्वसनाचा प्रश्न अजून सुटलेला नाही. आता लोकांची आणि लोकप्रतिनिधी म्हणून माझी सहनशक्ती संपली असल्यामुळे या मागण्या मान्य करून घेण्यासाठी शेवटी मी आज उपोषणाचा ईशारा सरकारला आणि वन विभागाला दिला आहे. ही कामे मार्गी लावण्यासाठी एक संधी आम्ही सरकारला देत आहोत. अन्यथा, मी स्वतः उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे," असेही दरेकर म्हणाले.
 
 
यावेळी दरेकर यांच्या सोबत जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, नगरसेवक प्रकाश दरेकर, नगरसेविका प्रीतम खंडागळे, सुरेखा पाटील, सुनीता यादव व विनोद मिश्रा, मोतिभाई देसाई, मागाठाणे भाजपा अध्यक्ष,दिलीप उपाध्याय, विक्रम चौगुले व महेश शिंदे हे उपस्थित होते.
 
परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी खालील प्रमाणे
 
 
 
१) दहिसर पूर्व येथील सर्व पाडे/वस्त्या म्हणजेच केतकीपाडा, सवित्री बाई फुले नगर, राम नगर, शिवाजी नगर, वायंगणकर वाडी, महाराष्ट्र खदान, कानडे मैदान व कांदिवली पूर्व येथील दामू नगर, भीम नगर, गौतम नगर, लहुगड, रामगड, सातारा कॅम्प, गांधी नगर, पांडे कंपाऊंड, जानू पाडा आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांचे/ घरांचे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पावसाळा लक्षात घेता तात्काळ सर्वेक्षण करण्यात यावे.
 
 
२) या परिसरातील नागरिकांना शौचालय, पिण्याचे पाणी, वीज, रस्ते इत्यादी मूलभूत सुविधा तात्काळ मिळाव्यात.
 
 
३) या परिसरातील नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत.
 
 
४) पाणीमाफीया, वीजमाफीयांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी पाणी कनेक्शन व वीज कनेक्शन अधिकृत करावे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

ED काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्याशी संबंधित असणार्‍या कंपनीवर सक्तवसुली संचालनालयाने शनिवारी कार्यवाहीस सुरूवात केली. या मालमत्तेत दिल्ली, मुंबई आणि लखनऊमधील प्रमुख असणाऱ्या मालमत्तांचा समावेश आहे. काँग्रेसच्या संबंधित असणाऱ्या कंपनीशी नॅशनल हेराल्ड प्रकरणात असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनीकडे ६०० कोटी रुपयांहून अधिक किंमतीची मालमत्ता असल्याचे बोलले जात आहे. त्यापैकी देशाची राजधानी दिल्लीतून बहादूर शाह जाफर मार्गावरील प्रतिष्ठित हेराल्ड हाऊस आहे...

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bangladeshi राजस्थानातील अजमेर पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी घुसखोरी व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. व्हिसाशिवाय अवैधपणे बांगलादेशी व्यक्तीने भारतात घुसखोरी केली आणि त्याला तब्बल २३ वर्षानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित अवैधपणे घुसखोरी करणाऱ्याचे नाव हे मोहम्मद शाहिद असून त्याचे वय वर्षे हे ४० आहे. तो अजमेरमधील अंदर कोट परिसरात अवैधपणे वास्तव्य करत होता. एटीएएफने एकूण अकरा कारवायांमध्ये एकूण २१ घुसखोरांना पकडले आहे. दरम्यान, आता दर्गा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121