मुंबई : मालाड-मालवणी दुर्घटनेत आत्तापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. स्वतःची व्होट बँक तयार व्हावी म्हणून बेकायदा इमारतींना देण्यात आलेले अभय लहान मुलांच्या जीवावर बेतले. मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे हात या दुर्घटनाबाधितांच्या रक्ताने माखलेले आहेत, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी केली आहे.
"मालवणी मालाड दुर्घटनेत ज्या मुस्लीम कुटूंबातील लहान मुलांनी जीव गमावला त्यांच्या हत्येला भ्रष्टाचार, स्थानिक आमदार अस्लम शेख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे सुरू असलेले राजकारण जबाबदार आहे.", असा आरोप देवधर यांनी केला आहे.
मुंबईकरांनो ताकद दाखवा!
भ्रष्टाचार आणि बेकायदा बांधकामाला अभय देऊन निष्पाप जीवांच्या जीवावर उठणाऱ्या मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन सुनील देवधर यांनी केले आहे.