'कोरोनाला नष्ट करेन' ; अभिनेत्री कंगनाला कोरोनाची लागण

    08-May-2021
Total Views |

Kangana_1  H x
मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतला कोरोनाची लागण झाल्याची माहिती तिने सोशल मिडियावर दिली आहे. काही दिवसांपूर्वी ट्विटरने तिचे अकाउंट बंद केले. त्यानंतर आता तिने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पोस्ट टाकत तिने ही बातमी शेअर केली आहे. स्वत:ला घरी क्वारंटाईन केले असल्याचेही तिने स्पष्ट केले आहे.
 
 
 
 
 
 
सोशल मिडियावर कंगना रानौतने सांगितले आहे की, "गेल्या काही दिवसांपासून माझी तब्येत बरी नव्हती तसेच डोळ्यांना आग होत होती. हिमाचलला जाण्यासाठी मी टेस्ट केली असता त्याचे रिपोर्ट्स पॉझिटीव्ह आले. मी स्वत:ला घरी क्वारंटाईन केले आहे. हा विषाणू माझ्या शरीरात किती काळ राहील हे सांगता येणार नाही. मला माहीत आहे. मी या विषाणूला नष्ट करेन. जर तुम्ही घाबरलात तर तो विषाणू तुम्हाला जास्त घाबरवेल. चला आपण एकत्र येत याचा सामना करू. हा छोट्या प्रकारचा ताप असून अनेकांना त्रास देत आहे. हर हर महादेव." अशा आशयाचा संदेश टाकत चाहत्यांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.