'वैकुंठ भूमीत काम करण्यासाठी अंगी धाडस व सेवाभाव हवा'

    07-May-2021
Total Views | 65

पुणे _1  H x W:



पुणे :
पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या पुणे महानगरपालिका, 'स्व' रूपवर्धिनी, 'सेवा सहयोग' व 'सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प' या संस्थांच्या स्वयंसेवकांचा सन्मान करण्यात आला आहे. भा.ज.यु.मो.पुणे शहर उपाध्यक्ष महेश पवळे यांच्यावतीने प्रत्यक्ष वैकुंठात सेवा देणाऱ्या कोविड योद्धयांचा सन्मान करण्यात आला आहे. यावेळी या योध्यांना स्व संरक्षणासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते वाफेचे मशिन भेट देण्यात आले.



'अवघड काळात ज्या स्वयंप्रेरणेने आपण काम करत आहात ते काम करण्यासाठी अंगी धाडस व सेवाभाव हवा ' असे उद्गार महापौर मोहोळ यांनी काढले. 'स्व'-रूपवर्धिनी, 'सेवा सहयोग' व 'सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प' यांच्याद्वारे हे काम केले जात आहे. यावेळी माजी उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे, नगरसेवक धीरज घाटे , स्मिताताई वस्ते, सदानंद गौडा, शैलेश लडकत, सामाजिक कार्यकर्ते संतोष लांडे, विक्रम बर्गे, स्वप्नील महाडिक, लक्ष्मीकांत मोरे, निलेश पारीख, निलेश धायरकर व स्वरूप वर्धिनीचे कार्यवाह विश्वास कुलकर्णी हे उपस्थित होते. राजे शिवराय प्रतिष्ठानने या कार्यक्रमाचे संयोजन केले होते. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. वैकुंठ स्मशानभूमीत पुणे महानगरपालिका, 'स्व' रूपवर्धिनी, 'सेवा सहयोग' व 'सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प' या संस्थेंमार्फत गेले अनेक दिवसांपासून कोविड आणि इतर मृतदेहावंर अत्यसंस्कार करण्याचे काम करण्यात येत आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121