मुंबई : संस्कार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ख्यातनाम चित्रकार वासुदेव कामत यांच्या सुविद्य पत्नी भारती वासुदेव कामत यांचे ६ मे रोजी निधन झाले. त्या ५९ वर्षांच्या होत्या. काशिमीरा येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. भारती कामत यांचा जन्म कर्नाटकच्या कारकळ येथे झाला. त्यांच्या जाण्यामुळे वासुदेव कामत यांच्या रथाचे एक चाक निखळले आहे.
कामत यांच्या यशस्वी वाटचालीत कायम पाठीशी असणाऱ्या व कला विश्वात कारकिर्द घडत असताना कायम सकारात्मक प्रेरणा असणाऱ्या, येणाऱ्या पाहुण्यांचे आदरतीर्थ्य कायम हसतमुखाने करणाऱ्या 'भारती वहिनी' गेल्याने कामत परिवार शोकाकुल आहे. परमेश्वर कामत परिवारास या दुःखातुन सावरण्यासाठी शक्ती देवो, अशी प्रार्थना संस्कार भारतीतर्फे करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण संस्कार भारती परिवार या दुःखात सहभागी असल्याची भावनाही व्यक्त करण्यात आली.