‘कोरोना’च्या गावाचा शोध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2021   
Total Views |

wuhan_1  H x W:
 
कोरोना विषाणूचे मूळ नेमके कुठे सापडेल, याचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत बरेच प्रयत्न झाले. ‘वुहान वायरोलॉजी ऑफ इन्स्टिट्यूट’मध्ये या विषाणूवर संशोधन सुरू होते का, तिथूनच या विषाणूचा प्रसार झाला का, याबद्दल अनेकांनी शंकाही उपस्थित केल्या. पण, तितक्या ठामपणे चीनविरोधात बोलण्याची हिंमत खुद्द आताचे अमेरिकन सरकारही करणार नाही.कोरोनाची सुरुवात कुठे झाली? पारदर्शक कारवाई करण्यास चीनने नकार का दिला? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. दबक्या आवाजात का होईना, चीनविरोधात काही माध्यमांनी याबद्दल किमान चर्चा करायला तरी सुरुवात केली आहे. अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ वृत्तपत्राने एक अहवाल प्रकाशित केला आहे. त्यात म्हटल्यानुसार, नोव्हेंबर २०१९ वुहानमधील प्रयोगशाळेतील तीन संशोधकांना न्यूमोनियाची लक्षणे आढळली होती. हीच लक्षणे कोरोनाचीही होती. त्यांनी रुग्णालयात मदतही मागितली होती. तिथूनच हा विषाणू पसरला नाही ना, असा संशय बळावला होता.
 
या अहवालात अमेरिकेने अधिक कठोर धोरण आखण्यासंदर्भात विचार केला आहे. कारण, कोरोना कसा पसरला, कुठे आढळला, हा आजार पसरण्याची सुरुवात कशी झाली याबद्दल पुन्हा एकदा पारदर्शक प्रक्रिया राबवण्यात यायला हवी. अमेरिकेने चीनच्या नव्या शत्रूची ढालही यात केली आहे. तैवानला या संपूर्ण तपास यंत्रणेचा ‘निरीक्षक’ बनवण्याची मागणी केली आहे. चीनने या अहवालाला खारीज करत अमेरिकेलाच फटकारले आहे. जानेवारी २०२१मध्ये ‘जागतिक आरोग्य संघटने’चे पथक वुहानच्या लॅबमध्ये पोहोचले होते. ज्याबद्दल कथिक स्वरूपात आरोप कायम आहेत. काही ठिकाणी आरोग्य संघटनेला जाण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव येईल हे लक्षात घेऊन चीनने काही नमुने तपासण्यासाठी दिले. मात्र, काही आकडेवारी, महत्त्वाची माहिती देण्यास नकार दिला होता. त्यामुळे चीनवर जगाचा संशय अद्याप कायम आहे.
 
‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या या नव्या अहवालानंतर आता अमेरिकेतील यंत्रणा या प्रकरणाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहत आहे. वुहानच्या लॅबमध्ये २०१९ या वर्षात नेमके काय झाले, याबद्दल तपासणी करण्यासाठी अमेरिका तयार झाली आहे. जो बायडन सरकार चीनविरोधात भूमिका घेईल की नाही, याबद्दल अद्यापही शंका कायम आहे. या नंतरच चीनने जगाला कोरोनाची अधिकृत माहिती पोहोचवली होती. अमेरिकेचे आरोग्य सचिव झेवियर बेसेरा यांनी आता पारदर्शक चौकशीचा मुद्दा उपस्थित केला. पण, चीनचे थेट नाव घेण्यास ते कचरले. ज्या वुहान शहरातून चीनचा कोरोना विषाणू बाहेर आला, त्या शहरावरून ‘कोविड’ विषाणूचे नामकरण करण्यास कुठल्याही संस्था, प्रसारमाध्यमे धजावत नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपती असताना हा प्रयत्न केला होता. मात्र, डाव्या संघटनांनी तो हाणून पाडला होता. चीनबद्दलचा रोष हा गेल्या काही काळात कमी झाला होता.
 
जागतिक आरोग्य परिषदेत बेसेरा म्हणाले होते की, “जगाला कोरोनाचे सत्य समजायलाच हवे.” त्यांचा हा रोख थेट चीनकडे असला तरीही त्यांनी अद्याप थेट नाव घेतलेले नाही. कारण, भविष्यात अशी महामारी पुन्हा आली, तर त्या संकटाचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत का, याबद्दल समजायला हवे. भविष्यात विषाणू महामारी आणि जैविक संकटांचा सामना करण्यासाठी तयार असावेत. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी प्रकरणे हाताळण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तैवानला जागतिक आरोग्य संघटनेवर आणण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, चीनने तैवान हा त्यांचाच भाग असल्याचे म्हणत या गोष्टीला विरोध केला आहे. त्यामुळेच तैवान हा ‘निरीक्षक’ बनण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत.
तीन मुद्द्यांवरून संशयाची सुई चीनकडे वळत आहे.
 
ऑस्ट्रेलियाने १५ दिवसांपूर्वीच अहवाल प्रकाशित केला होता की, चीनच्या वुहान प्रांतातून विषाणू बाहेर आला हे नाकारले जाऊ शकत नाही. पुरावे थेट वुहानकडे इशारा करतात. दुसरा अहवालही ऑस्ट्रेलियातूनच आला. चीनमध्ये सहा वर्षांपासून जैविक हत्यारे बनवण्याची तयारी केली जात होती, असे सांगण्यात आले होते. तिसरी म्हणजे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या अहवालात म्हटल्यानुसार, २०१९ नोव्हेंबरमध्ये हा विषाणू बाहेर आला होता, ज्यात चिनी संशोधकांना याची लागण झाली होती. चीनने हे सर्व आरोप फेटाळले. या सर्व अहवालांना खोटे ठरवत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. भविष्यात कोरोनाच्या प्रसाराबद्दल थेट पुरावे आढळतात का, चीनविरोधात कुणी थेट भूमिका घेणार का, हे येणारा काळच ठरवणार आहे.
 
कोरोना विषाणूचे मूळ नेमके कुठे सापडेल, याचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत बरेच प्रयत्न झाले. ‘वुहान वायरोलॉजी ऑफ इन्स्टिट्यूट’मध्ये या विषाणूवर संशोधन सुरू होते का, तिथूनच या विषाणूचा प्रसार झाला का, याबद्दल अनेकांनी शंकाही उपस्थित केल्या. पण, तितक्या ठामपणे चीनविरोधात बोलण्याची हिंमत खुद्द आताचे अमेरिकन सरकारही करणार नाही.
कोरोनाची सुरुवात कुठे झाली? पारदर्शक कारवाई करण्यास चीनने नकार का दिला? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. दबक्या आवाजात का होईना, चीनविरोधात काही माध्यमांनी याबद्दल किमान चर्चा करायला तरी सुरुवात केली आहे. अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ वृत्तपत्राने एक अहवाल प्रकाशित केला आहे. त्यात म्हटल्यानुसार, नोव्हेंबर २०१९ वुहानमधील प्रयोगशाळेतील तीन संशोधकांना न्यूमोनियाची लक्षणे आढळली होती. हीच लक्षणे कोरोनाचीही होती. त्यांनी रुग्णालयात मदतही मागितली होती. तिथूनच हा विषाणू पसरला नाही ना, असा संशय बळावला होता.
  
या अहवालात अमेरिकेने अधिक कठोर धोरण आखण्यासंदर्भात विचार केला आहे. कारण, कोरोना कसा पसरला, कुठे आढळला, हा आजार पसरण्याची सुरुवात कशी झाली याबद्दल पुन्हा एकदा पारदर्शक प्रक्रिया राबवण्यात यायला हवी. अमेरिकेने चीनच्या नव्या शत्रूची ढालही यात केली आहे. तैवानला या संपूर्ण तपास यंत्रणेचा ‘निरीक्षक’ बनवण्याची मागणी केली आहे. चीनने या अहवालाला खारीज करत अमेरिकेलाच फटकारले आहे. जानेवारी २०२१मध्ये ‘जागतिक आरोग्य संघटने’चे पथक वुहानच्या लॅबमध्ये पोहोचले होते. ज्याबद्दल कथिक स्वरूपात आरोप कायम आहेत. काही ठिकाणी आरोग्य संघटनेला जाण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव येईल हे लक्षात घेऊन चीनने काही नमुने तपासण्यासाठी दिले. मात्र, काही आकडेवारी, महत्त्वाची माहिती देण्यास नकार दिला होता. त्यामुळे चीनवर जगाचा संशय अद्याप कायम आहे.
 
‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या या नव्या अहवालानंतर आता अमेरिकेतील यंत्रणा या प्रकरणाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहत आहे. वुहानच्या लॅबमध्ये २०१९ या वर्षात नेमके काय झाले, याबद्दल तपासणी करण्यासाठी अमेरिका तयार झाली आहे. जो बायडन सरकार चीनविरोधात भूमिका घेईल की नाही, याबद्दल अद्यापही शंका कायम आहे. या नंतरच चीनने जगाला कोरोनाची अधिकृत माहिती पोहोचवली होती. अमेरिकेचे आरोग्य सचिव झेवियर बेसेरा यांनी आता पारदर्शक चौकशीचा मुद्दा उपस्थित केला. पण, चीनचे थेट नाव घेण्यास ते कचरले. ज्या वुहान शहरातून चीनचा कोरोना विषाणू बाहेर आला, त्या शहरावरून ‘कोविड’ विषाणूचे नामकरण करण्यास कुठल्याही संस्था, प्रसारमाध्यमे धजावत नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपती असताना हा प्रयत्न केला होता. मात्र, डाव्या संघटनांनी तो हाणून पाडला होता. चीनबद्दलचा रोष हा गेल्या काही काळात कमी झाला होता.
 
जागतिक आरोग्य परिषदेत बेसेरा म्हणाले होते की, “जगाला कोरोनाचे सत्य समजायलाच हवे.” त्यांचा हा रोख थेट चीनकडे असला तरीही त्यांनी अद्याप थेट नाव घेतलेले नाही. कारण, भविष्यात अशी महामारी पुन्हा आली, तर त्या संकटाचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत का, याबद्दल समजायला हवे. भविष्यात विषाणू महामारी आणि जैविक संकटांचा सामना करण्यासाठी तयार असावेत. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी प्रकरणे हाताळण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तैवानला जागतिक आरोग्य संघटनेवर आणण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, चीनने तैवान हा त्यांचाच भाग असल्याचे म्हणत या गोष्टीला विरोध केला आहे. त्यामुळेच तैवान हा ‘निरीक्षक’ बनण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत.
तीन मुद्द्यांवरून संशयाची सुई चीनकडे वळत आहे.
 
ऑस्ट्रेलियाने १५ दिवसांपूर्वीच अहवाल प्रकाशित केला होता की, चीनच्या वुहान प्रांतातून विषाणू बाहेर आला हे नाकारले जाऊ शकत नाही. पुरावे थेट वुहानकडे इशारा करतात. दुसरा अहवालही ऑस्ट्रेलियातूनच आला. चीनमध्ये सहा वर्षांपासून जैविक हत्यारे बनवण्याची तयारी केली जात होती, असे सांगण्यात आले होते. तिसरी म्हणजे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या अहवालात म्हटल्यानुसार, २०१९ नोव्हेंबरमध्ये हा विषाणू बाहेर आला होता, ज्यात चिनी संशोधकांना याची लागण झाली होती. चीनने हे सर्व आरोप फेटाळले. या सर्व अहवालांना खोटे ठरवत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. भविष्यात कोरोनाच्या प्रसाराबद्दल थेट पुरावे आढळतात का, चीनविरोधात कुणी थेट भूमिका घेणार का, हे येणारा काळच ठरवणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@