गडचिरोली : महाराष्ट्र पोलीस दलातील C-60 कमांडो पथकाने १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले असून आत्तापर्यंत सहा मृतदेह हाती लागले आहेत. एट्टापल्ली तालुक्यातील पैदी कोटमी जंगलात ही चकमक झाली. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी संदर्भातील माहिती दिली आहे.
शुक्रवारी सकाळपासूनच नक्षलविरोधी अभियान राबवण्यात आले आहे. या ठिकाणी नक्षलवाद्यांचे शिबिर सुरू होते. नेमकी याच ठिकाणी पोलीसांची तुकडी पोहचली. त्यावेळी पोलीसांनी नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या चकमकीत १३ नक्षली ठार झाले.
चकमक उशीरापर्यंत सुरू होती, असे सांगण्यात आले.
त्यावेळी सहा मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहे. अधीक्षक गोयल म्हणाले, "एकूण किती नक्षलवादी ठार झाले आहेत याची माहिती मोहिम संपल्यावरच हाती येणार आहे. कसनसुर येथे नक्षलवादी दल एकत्र आले. तेंदू हंगाम सुरू असल्याने नक्षली तेंदू कंत्राटदारांकडून खंडणी वसूल करतात. याच नियोजनाची बैठक सुरू होती, ही माहिती पोलीसांना मिळाल्यावर अभियान सुरू केली.