मुंबई : एकीकडे राज्यात पंढरपूर निवडणुकीमध्ये भाजपने विजय मिळवला. तर दुसरीकडे तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये २००हून अधिक जागांवर आघाडी मिळवून विजय निश्चित केला आहे. मात्र, गेल्या निवडणुकीत भाजपला ३ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत भाजपने ८०हुन अधिक जागांवर आघाडी मिळवली आहे. यावर पत्रकार, ब्लॉगर आणि स्तंभलेखिका शेफाली वैद्य यांनी 'हा विजय पक्षाचा की एका विचारधारणेचा?' असा प्रश्न उपस्थित केला आहे. याचे कारण म्हणजे तिथे होणाऱ्या हिंदुंवरील अत्यचार आणि निकालादरम्यान भाजप कार्यालयावर हल्ला.
पत्रकार शेफाली वैद्य यांनी यावेळी सांगितले की, " पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या सीमेवर राहणाऱ्या काही खेड्यांमध्ये केवळ एक -दोन हिंदू कुटुंबांचे वास्तव्य राहिले आहे. तेथील हिंदू कुटुंबांना एखाद्या मंदिरात दिवा लावण्याचीही भीती वाटत आहे. कलकत्तामध्ये राहणाऱ्या काहींचे मेसेज आले की, "आम्हाला बंगालमध्ये हिंदू म्हणून राहण्याची भीती वाटू लागली आहे. कारण आम्ही बघतो आहोत की, काही अल्पसंख्यांक तरुण मास्क न घालता. अल्लाह हु अकबरचे नारे देत ते तृणमूल कॉंग्रेसच्या विजयाच्या मिरवणुका काढत आहेत.' असे एकाचे नाही तर ७ - ८ जणांचे असे मेसेज आले आहेत. मग हा जो विजयी उन्माद आहे. तो नक्की कसला आहे? एक पक्ष नाही तर एक विचारधारा जिंकलेली आहे, त्याचा आहे. हा लोकसंख्याशास्त्रीय बदल हा काही फक्त ममता बॅनर्जीमुळेच नाही तर त्याआधी बंगालला दुबवलेल्या वामपंथीनी केला आहे."
"ममता बॅनर्जी हे तिसऱ्या आघाडीचा चेहरा?"
"तिसऱ्या आघाडीला आता ममता बॅनर्जीचा चेहरा हा होऊ शकतो. कारण गेल्या ३ निवडणुकांमध्ये ममतांनी स्वतःच्या कर्तुत्वावर हे यश मिळवले. त्यांचे श्रेय हे त्यांना द्यायलाच हव. तिसऱ्या आघाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध एका चेहऱ्याची गरज होती पण तो चेहरा त्यांना सापडत नव्हता. बंगालमध्ये परिवर्तनाचे वारे आहे, अशी चर्चा असताना खात्रीपूर्वक विजय खेचून आणलेला आहे. सलग ३ वेळा विजय मिळवल्यामुळे नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून तिसरी आघाडी ही ममतांचा विचार करू शकते."
"आजच्या निकालामुळे कॉंग्रेसचे स्थान राष्ट्रीय राजकारणात काय आहे हे स्पष्ट झाले"
पुढे कॉंग्रेसचा विचार करता शेफाली यांनी टीका करताना म्हंटले की, "ममता बॅनर्जी हा तिसऱ्या आघाडीचा चेहरा होईल हे कॉंग्रेसला आवडेल का? हे मोठे कोडे आहे. आजचा निकाल पाहता कॉंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष म्हणून उभा राहतो का? अजूनही काही लोकांचा असा समाज आहे की, राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार ठरू शकतात. मात्र, आजचे निकाल हे कॉंग्रेसचे अपयश सिद्ध करतात. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष विशेषतः गांधी घराणे स्वतःचे स्थान सहजासहजी सोडेल का? हा मोठा प्रश्न आहे."