सीबीआय चौकशीमुळे गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी होणार असून १५ दिवसांत प्राथमिक चौकशीचा तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. याबाबत बोलताना, भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे गेले अनेक दिवस याबाबत चर्चा सुरु होती. आणि याप्रकरणी देण्यात आलेल्या सीबीआय चौकशीच्या आदेशांचे पालन करत यासंदर्भातले सत्य शोधावे आणि दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी देखील भातखळकर यांनी केली आहे.
परमवीर सिंह यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले होते.