भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण

    29-Apr-2021
Total Views | 85

Pankaja Munde_1 &nbs
 
 
मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा वाढतच आहे. सर्वसामान्यांसह लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे घरीच क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच खासदार प्रीतम मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
 
 
 
 
 
 
पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. "माझ्या कोरोनाच्या चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलेल्या लोकांनी खबरदारी घ्यावी आणि कोरोनाची चाचणी करून घ्यावी," असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे. चार दिवसांपूर्वी बीडच्या खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या बहीण प्रीतम मुंडे यांनाही कोरोनाची लक्षण जाणवू लागल्यामुळे होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला होता.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121