आंबोलीमध्ये लांडग्याचा १२ जणांवर हल्ला; २ कुत्री केली ठार

    23-Apr-2021
Total Views | 653

wolf_1  H x W:


 


मुंबई (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली गावात एका लांडग्यांने शुक्रवारी धुमाकूळ घातला. यामध्ये त्याने १३ लोकांवर हल्ला करून त्यांचा चावा घेतला. दोन कुत्र्यांना ठार केले आणि ३ म्हशींवर हल्ला केला. दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या लांडग्याला पकडले. मात्र, पकडल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
 
 
आंबोलीमध्ये हा प्रकार शुक्रवारी सकाळी पाच वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत सुरू होता. सुरुवातीला हा लांडगा सतीच्यावाडी येथे माळरानावर आपल्या शेतात राखणदारीसाठी गेलेल्या नंदू गावडे यांच्या पायाला चावला. त्यानंतर हा लांडगा गावठणवाडी फौजदार वाडी आणि हरिजन वाडी या ठिकाणी पोहोचला. या परिसरात त्याने एकूण सात जणांना चावा घेतला. यावेळी कृष्णा जाधव या तरुणाने धाडस दाखवून एकदा या प्राण्याला पकडले. परंतु, आजूबाजूच्या ग्रामस्थांनीत्याला म्हणावे तसे सहकार्य केले नाही. त्यामुळे त्याला लांडग्याला नाईलाजास्तव सोडावे लागले. या झटापटीत कृष्णाजाधव यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या हाताला चार टाके पडले आहेत.
 
 
 
त्यानंतर त्याच वाडीतील आणखी पाच जणांना या लांडग्याने चावा घेतला. यामध्ये अशोक जाधव, सहदेव जाधव, कृष्णा जाधव यांचा समावेश आहे, तर राधाबाई धुरी (वय ६५) या वृद्ध महिलेच्या हातालाही या लांडग्याने चावा घेतला. त्यानंतरहा लांडगा बाजार वाडी येथे आला. बाजार वाडी येथील हेमंत नार्वेकर यांच्या अंगावरही तो धावून गेला. परंतु त्यांनी प्रसंगावधान राखून त्या लांडग्याला पिटाळून लावले. तत्पूर्वी त्यांच्या कुत्र्याला त्याने जखमी केले. पुढे हा लांडगा चौकुळरस्त्यावर गेला. त्याठिकाणी गाडीची वाट बघत असलेल्या एका ग्रामस्थाला हा लांडगा चावला. असे एकूण १२ जणांना या लांडग्याने किरकोळ आणि गंभीर दुखापती केल्या. याशिवाय दोन रेड्यांचा त्याने चावा घेतला, तर त्याने केलेल्या हल्ल्यात दोन कुत्र्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण होते.
 
 
 
ग्रामस्थ आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जंग जंग पछाडून या लांडग्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु हा लांडगा आढळून आला नाही. सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास राघवेश्वर मंदिर परिसरातून हा लांडगा जाताना दिसून आला. लागलीच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना या लांडग्याच्या अंगावर गोणपाट टाकून त्याला पकडले. परंतु वन्यप्राण्यांना पकडल्याने बऱ्याच वेळा त्यांचे हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन होते. तसे होऊन हा लांडगा गतप्राण झाला. त्यानंतर वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव आणि वन कर्मचाऱ्यांनी शवविच्छेदनासाठी त्याला सावंतवाडीला घेऊन गेले. पश्चिम घाटामध्ये लांडगे आढळत नसल्याची माहितीवन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी यांनी दिली. त्यामुळे कोल्हापूर किंवा सांगली परिसरातील गवताळ प्रदेशामधून हालांडगा भरकटून या परिसरात आल्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121