प्रसिद्ध दिग्दर्शिका व निर्मात्या सुमित्रा भावे यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2021
Total Views | 88

sumatra bhave_1 &nbs

पुणे :
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या निर्मात्या व दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज पुण्यात निधन झाले. त्या ७८ वर्षांच्या होत्या. दिठी, अस्तु, दहावी फ, अस्तु, नितळ, संहिता, दोघी, वेलकम होम, एक कप असे पठडीबाहेरचे सामाजिक विषय सहज पद्धतीने त्या प्रेक्षकांसमोर मांडत . गेल्या अडीच महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते. पुण्यातल्या सह्याद्री रुग्णालयात त्यांनी सोमवारी (१९ एप्रिल) सकाळी अखेरचा श्वास घेतला.

सुमित्रा भावे यांचा जन्म १२ जानेवारी १९४३ रोजी पुण्यात झाला. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली. तर टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई येथून पॉलिटिकल सायन्स अँड सोशोलॉजी या विषयात पदव्युत्तर पदवीही मिळवली. सुमित्रा भावेंनी विविध संस्थांसाठी स्वयंसेवी काम सुरू केले. त्यांनी ऑल इंडिया रेडिओ, नवी दिल्ली येथे मराठी भाषेच्या वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केले आहे.


सुमित्रा भावे यांनी सुनील सुकथनकर यांच्या साथीने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. हलक्या फुलक्या पद्धतीने सामाजिक विषयांना हात घालणारे चित्रपट त्यांनी दिले. ‘दहावी फ’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘बाधा’, ‘नितळ’, ‘एक कप च्या’, ‘घो मला असला हवा’, ‘कासव’, ‘अस्तु’ अशा अनेक चित्रपटांना सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर जोडीचा परिसस्पर्श लाभला. ‘घो मला असला हवा’ या सिनेमातून राधिका आपटेसारखी हरहुन्नरी कलाकार मनोरंजन विश्वाला मिळाली. बाई, पाणी लघुपटांना लोकप्रियता आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी १९९५ मध्ये ‘दोघी’ हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार केला. या चित्रपटालाही प्रेक्षक-समीक्षकांकडून पसंतीची मोहोर मिळाली. त्यांचे अनेक चित्रपट आंतरराष्ट्रीय महोत्सवांत गाजले; तसे अनेक चित्रपटांना राज्य शासन आणि राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाले.चित्रपट हे माध्यम सर्जनशील आहेच. त्यांनी दिग्दर्शिक केलेल्या 'कासव' या चित्रपटाने २०१७ मध्ये सुवर्ण कमळही मिळवले आहे.

सुमित्रा भावे यांच्या फुप्फुसात गेल्या काही महिन्यांपासून संसर्ग झाला होता. त्यासाठीचे उपचारही त्या घेत होत्या. दरम्यान त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली. पण ती निगेटिव्ह आली होती. फुप्फुसाच्या संसर्गाचे उपचार चालू असतानाच गेल्या 15 दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. अखेर सोमवारी सकाळी सव्वासात वाजता त्यांचं निधन झालं.
@@AUTHORINFO_V1@@
जरुर वाचा