केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केली घोषणा
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रास केंद्र सरकारतर्फे अतिरिक्त १ हजार १२१ जीवरक्षक प्रणाली अर्थात व्हेंटिलेटरचा पुरवठा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आरोग्यविषयक पायाभूत सुविधा, औषधे आणि अन्य सर्व प्रकारची मदत केली जात आहे, अशी माहिती देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.
केंद्र सरकार महाराष्ट्रास सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारकडून वारंवार होत आहे. मात्र, प्रत्यक्षात केंद्र सरकार सर्वतोपरी सहाय्य करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी यांनी ट्विट करून महाराष्ट्रास सहकार्य केले जात असल्याचे सांगितले आहे.
ते म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत संवाद केला असून राज्यास मदत केली जात असल्याची ग्वाही पुन्हा एकदा देण्यात आली आहे. महाराष्ट्रात आरोग्यविषयक पायाभूच सुविधा असो, औषधे असो किंवा अन्य सर्व प्रकारची मदत केली जात आहे. त्याचप्रमाणे राज्यास वैद्यकीय वापराच्या ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा अविरतपणे केला जात आहे. राज्यात वाढत असलेल्या करोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त १ हजार १२१ व्हेंटिलेटर पुरविण्यात येत आहेत, असेही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.