नैसर्गिक जलस्रोत आणि गुणधर्म

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

Water_1  H x W:
 
 
मागील लेखामध्ये जड पाणी (हार्ड वॉटर) व साधारण पाणी (सॉफ्ट वॉटर) याबद्दल जाणून घेतले. आयुर्वेदशास्त्रात विविध ठिकाणच्या पाण्याचे वर्णन केलेले आहे. तसेच, पावसाचे पाणी चांगले की निषिद्ध, थंड पाण्याचे गुण, गरम पाण्याचे गुण इ. वर्णिले आहे. त्याबद्दल आजच्या लेखातून जाणून घेऊया.
 
 
पावसाचे पाणी
 
 
पहिल्या पावसाचे पाणी आणि अवेळी पडणार्‍या पावसाचे पाणी पिण्यासाठी वापरू नये. कारण, अशा पाण्यात विविध कीटक, जंतू, त्यांचे तंतू, विष्ठा, मूत्र, विष इ. अहितकारक घटक असू शकतात. हे पाणी पिण्यास अयोग्य समाजावे. पावसाचे पाणी जमिनीवर पडण्यापूर्वीच जर स्वच्छ चांगल्या पात्रामध्ये/भांड्यात गोळा केले, तर ते पिण्यास योग्य आहे. तसेच पावसाचे पाणी काळ्या किंवा पांढर्‍या स्वच्छ जमिनीवर व पुष्कळ मोठ्या परिसरात पडून साठवले गेले आणि अशा जागी ऊन व वारा खेळता असला, तरी ते पाणी पिण्यास योग्य समजावे. पाऊस पडत असताना ते पाणी चांदीच्या पात्रात गोळा करावे अथवा साठू द्यावे. त्यात थोडा भात घालून ठेवावा. हा भात जर तसाचा राहिला म्हणजे भाताचा रंग बदलला नाही, तर ते पाणी पिण्यास योग्य आहे, असे समजावे.
 
 
पावसाच्या पाण्याला ‘गंगाजल’ असे आयुर्वेदात म्हटले आहे. या पाण्याचा जमिनीशी संपर्क येण्यापूर्वीच जर ते एका स्वच्छ पात्रात गोळा केले, तर याला ‘अंतरिक्ष जल’ म्हणतात. गंगाजल सर्वात शुद्ध व स्वच्छ असते. मनाला हुशारी, तजेला आणणारे, प्यायल्यास तृप्तीकर समाधान वाटेल, असे असते. ते स्पर्शाने व गुणाने थंड असते, पचायला हलके असते. त्याची स्वत:ची वेगळी चव नसते (अव्यक्त रस) गंगाजल आल्हादकारक, तृप्तीदायक व अमृतासमान आहे. गंगाजल जर जमिनीवर पडून ऊन-वार-चांदण्यांचा संपर्क आला, तर त्या-त्या परिसरातील पाण्यासारखे या पाण्याचेही गुणधर्म होतात. 
 
 
वाहत्या पाण्यात सभोवतालातील अहितकारक घटक जास्त टिकत नाहीत. पण, {चखल, शेवाळं, गवत, झाडाची पाने, तृण व पालापाचोळा
 
 
पाण्यात पडला असल्यास ते पाणी गढूळ होते. ऊन-वारा-चांदणे यांचा संपर्क ज्या पाण्याशी होत नाही, असे पाणीही पिण्यास निषिद्ध आहे. पाण्यास फेस असल्यास त्यात कृमी/कीटक असल्यास, दातांना सोसणार नाही, इतके थंड असल्यास, दातातून कळा उत्पन्न होतील असे गार पाणी व दुष्ट पाणी गरम असल्यास हे पिण्यासाठी निषिद्ध समजावे. ज्या नद्या पश्चिम समुद्रात जाऊन मिळतात, ज्यांचा प्रवाह फार जोराचा आहे व त्यातील वाहते पाणी निर्मळ आहे, अशा नद्यांचे पाणी पथ्यकारक आहे. यापेक्षा वेगळे असलेल्या नद्यांचे पाणी पथ्यकारक नाही, असेच समजावे. ज्या नद्यांचे पाणी खडकांवरून वाहून आपटून वाहते (जसे हिमालयापासून उत्पन्न सर्व नद्या) ज्या नद्यांना प्रवाह अधिक आहे, अशा नद्यांचे पाणी पिण्यास योग्य आहे, पथ्यकर आहे व उपयोगी आहे. पण, जर वाहत्या पाण्याचा प्रवाह मंद असला तर असे पाणी प्यायल्याने विविध प्रकारचे आजार उद्भवू शकतात, जसे वारंवार जंत होणे, हत्तीरोग, कंठरोग, {शरोरोग इ. बंगाल, माळवा व उत्तर कोकण प्रदेशातील नद्यांचे पाणी प्यायल्याने मूळव्याधीसारखे त्रास उद्भवू शकतात. महेंद्र पर्वतापासून उत्पन्न झालेल्या नद्यांचे पाणी प्यायल्याने उदर/जलोदर व हत्तीरोग उद्भवू शकतो. सह्यविंध्योद्भव (म्हणजे सह्याद्री-विंध्य प्रदेशात ज्यांचा उद्भव होतो) नद्यांचे पाणी प्यायल्याने {वविध त्वचाविकार, पांडू व अनेक शिरोरोग उत्पन्न होतात. विंध्याद्रीच्या वायव्येकडील प्रांतातील नद्यांच्या पाण्याने त्रिदोषांचा नाश होतो, हे पाणी आरोग्यकारक आहे. या पाण्याने शरीराला व मनाला बळ मिळते व ताकद वाढते. समुद्राचे पाणी त्रिदोषांना उत्पन्ऩ करणारे वाढवणारे आहे, तेव्हा ते पिऊ नये. काही विशिष्ट आजारांमध्ये शारीरिक तक्रारींमध्ये पाणी पिणे टाळावे, असे आयुर्वेदशास्त्रात सांगितले आहे. म्हणजेच पाण्याचे प्रमाण कमीत कमी असावे. हे आजार म्हणजे पचनशक्ती मंदावणे, पोटात गोळा (वात) फिरणे, उदर, मूळव्याध, संग्रहणी (आव होणे-आयबीएस), शरीरावर सूज येणे इ. {नरोगी व्यक्तींनीही अनावश्यक, अतिरिक्त, जास्त पाणी पिऊ नये. शरद ऋतू व ग्रीष्म ऋतू (ऑक्टोबर हिट व उन्हाळा) या दोन ऋतूंव्यतिरिक्त अन्य ऋतूंमध्ये थोडे-थोडेच पाणी प्यावे, असे शास्त्र सांगते. जेवणाच्या सुरुवातीस निरोगी व्यक्ती जर पाणी प्यायली, तर ती कृश होते, जेवणामध्ये पाणी प्यायली, तर व्यक्ती सडपातळ होते व जेवणाच्या शेवटी पाणी प्यायल्याने मनुष्य स्थूल होतो, असे शास्त्रवचन आहे. (अर्थात पाणी किती प्यावे, याबद्दल आधीच्या लेखांमधून विस्तृत माहिती दिली आहे.)
 
 
वरील सर्व गुणधर्म साध्या नैसर्गिक पाण्याचे आहेत. गरम पाणी, थंड पाणी इ. चे गुणधर्म खालीलप्रमाणे आहेत.
 
 
तापवून निवळलेले (थंड झालेलं) पाणी पचायला हलके असते. असे पाणी प्यायल्याने कफ उत्पन्न होत नाही. कफाच्या {वविध अवस्थांमध्ये, त्रासांमध्ये गरम करुन साधं पाणी प्यावे. हेच पाणी पित्त वाढल्याने होणार्‍या विविध आजारांमध्येही उपयोगी आहे. पण, हे पाणी ताजे असावे. आज तापवून उद्या पिणे किंवा फ्रिजमध्ये ठेवून गार करून पिणे टाळावे. असे शिळे पाणी, फ्रिजमधले पाणी प्यायला जड व त्रिदोषांची तुष्टी करुन विविध रोगांना उत्पन्न करते.
 
 
ऊन पाण्याने म्हणजे कोमट पाण्यामुळे पचनशक्ती सुधारते. तसेच अग्नी (पाचकाग्नी) संघुसण करते. हे पाणी पचायला हलके व मूत्रशोधक आहे. मूत्रप्रवृत्तीच्या {वविध तक्रारींमध्ये उपयोगी आहे. तसेच उचकी लागणे, अपचन, सर्दी-पीनस, कार्सा (खोकला), दम लागणे, ताप येणे, पोट फुगणे इ. तक्रारींवरती उपयोगी पडते, पथ्यकर ठरते. वाताचे अनुमोन करते. उसण भरलेली असल्यास त्यात आराम पडतो. कफाच्या विविध तक्रारींमध्येही कोमट पाणी उपयोगी आहे. म्हणून विविध आजारांच्या चिकित्सेमध्ये कोमट पाण्यातून औषध घेण्यास तज्ज्ञ वैद्य सांगतात.
 
 
थंड पाणीदेखील काही अवस्थांमध्ये उपयोगी ठरते. चक्कर येणे, मळमळणे, उलट्या होणे, कामाने /कष्टाने थकून गेल्यावर डोळ्यावर ग्लानी आली असल्यास थंड पाणी प्यायल्याने बरे वाटते. अतिमद्यपानानंतर होणार्‍या मदात्ययासारख्या आजारात थंड पाणी पथ्यकर सांगितले आहे. डोळ्यांसमोर काळोखी येणे, घशाला कोरड पडणे, तहान लागणे, उन्हाळी होणे, सर्वांग, एकांगाची आग/दाह होणे रक्तपित्तासारखा विकार असल्यास गार पाणी उपयोगी आहे. या प्रकारे विविध ठिकाणचे पाणी व विविध विकारांमधील त्याचा वापर शास्त्रात सांगितला आहे.
 
 
(क्रमश:)
 
 
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
 
 
@@AUTHORINFO_V1@@