'अहिल्याबाईं होळकरां'च्या नावाने असलेल्या योजनेचे नाव बदलले ?

    09-Mar-2021   
Total Views | 333



media_1  H x W:


महाराष्ट्राची आर्थिक पाहणी व अर्थसंकल्पात आढळले विरोधाभासी तथ्य

महाफसवाफसवी ? अस्तित्वात असलेल्या योजनेची नव्याने घोषणा ??

विशेष (सोमेश कोलगे): राज्य सरकारने विद्यार्थिनींना ग्रामीण भागात एस. टी. प्रवास मोफत करण्याविषयी घोषणा केली. तसेच या घोषणेला सवित्रिबाई फुले योजना असे नावही दिले. वस्तुतः विद्यार्थिनींना मोफत बस प्रवास ही योजना आधीपासूनच अहिल्याबाई होळकर योजनेच्या नावाने अस्तीत्वात असल्याची माहिती समोर आली आहे.

शासनाने अर्थसंकल्प जाहीर केला. योगायोगाने जागतिक महिला दिनाच्या दिवशीच राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. त्यामुळे मोठ्या उत्साहात सरकारने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना मोफत एस.टी. बस प्रवास करणार असल्याविषयी घोषणा केली. प्रत्यक्षात अशा स्वरूपाची योजना फडणवीस सरकारच्या काळापासून 'अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजना' या नावाने अस्तित्वात असल्याची माहिती दै. मुंबई तरुण भारतने उघड केली आहे. याविषयी शासननिर्णय १३ ऑगस्ट १९९६ रोजी करण्यात आला आहे. मग अजितदादांनी ज्या योजनेची घोषणा केली त्याला नवी योजना कसे म्हणायचे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तसेच याच महाविकास आघाडी सरकारच्या आर्थिक पाहणीत पान क्रमांक २०० वर 'अहिल्याबाई होळकर योजना' म्हणून अशा योजनेचा उल्लेख आहे. आर्थिक पाहणी अहवाल २०२०-२१ याच सरकारने नुकतेच जाहीर केले आहे. विधानसभेत पटलावर हा अहवाल ठेवण्यात आला होता.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन याविषयी सवाल उपस्थित केले आहेत.

सोमेश कोलगे 

महविद्यालयीन विद्यार्थी आहे. महाराष्ट्रातील नावाजलेल्या वक्तृत्व, वादविवाद स्पर्धांतून सहभाग आणि प्राविण्य संपादन केले आहे. कायदा, न्यायशास्त्र विषयाची विशेष आवड.  संघाचा स्वयंसेवक . विविध विधायक कारणांसाठी न्यायालय तसेच  महिला आयोग, ग्राहक मंच अशा अर्ध-न्यायिक संस्थांकडे जनहितार्थ याचिका.  माहिती अधिकार, २००५  आणि तत्सम अधिकारांचा सकारात्मक उपयोग.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121