मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका नवीन मतदार नोंदणी बनवण्याचे काम अशा पद्धतीने झाले आहे की, त्याच्यावर एक सिनेमा बनेल. केवळ भारतीय जनता पक्षाने २०,००० हरकती नोंदवल्या असून, त्यावर सुनावणी घ्या अशी मागणी भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली.
कोरोनाचे कारण देत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्याच्या निर्णयाला आज सरकारने विधानसभेची परवानगी घेतली. त्याला विरोध करताना आमदार आशिष शेलार यांनी कोरोना आणि मान्सून पूर्व तयारीची कामांमध्ये लोकप्रतिनिधींनींचे महत्त्व लक्षात घेऊन, प्रशासकाला किती काळ अमर्याद अधिकार द्यायचे हे पण ठरवावे लागेल, असा दावा केला.
नवी मुंबईतील मतदार यादीत प्रचंड घोळ असल्याने भाजपाने २० हजार हरकती नोंदवल्या आहेत. त्याबाबत तातडीने सुनावणी घ्या. प्रत्येक केसची सुनावणी घ्या अशी आग्रही मागणी त्यांनी केल्या. ज्यावेळी सरकार निवडणूका पुढे ढकलण्याची परवानगी मागते आहे तेव्हा, एका वाक्यात सांगा झाला तर अमर्याद अधिकार राज्य सरकारकडे येण्याच्या या निर्णयाला भाजपाचा विरोध आहे, असेही त्यांनी सांगितले.