आज मुंबईत आढळले 5,504 रुग्ण
मुंबई : मुंबईत सुरू झालेली रुग्णवाढीची संख्या कमी होण्याची चिन्हे अद्याप तरी दिसत नाहीत. कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असून आज रुग्णसंख्येत 300 रुग्णांची वाढ झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार रविवारी कोरोना रुग्णसंख्येत 3,775 इतकी विक्रमी वाढ झाली होती. रुग्णवाढीचा हा दर सोमवार, मंगळवारी देखील कायम होता. बुधवारी रुग्णसंख्येत तब्बल दीड हजाराने वाढ झाली तेव्हा मुंबईतील बाधितांची एकुण संख्या 5185 होती. आज गुरुवारी 5,504 रुग्ण सापडले. त्यामुळे रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे.
आजपर्यंतची बाधितांची एकूण रुग्णसंख्या 3,80,115 झाली आहे. दिवसभरात 2,281 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 3,33,603 इतकी झाली. आज 14 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकुण संख्या 11,620 झाली असुन मुंबईत सध्या 33,961 बाधित रुग्णालयात उपचार घेत आहेत. प्राप्त माहितीनुसार मुंबईत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा दर 88 टक्के असून रुग्णवाढीचा दर हा 0.89 टक्के आहे.