मनसुख हिरन प्रकरण 'एनआयए'कडे सोपवा : ठाणे सत्र न्यायालय

    24-Mar-2021
Total Views | 159

mansukh hiran_1 &nbs



ठाणे :
मनसुख हिरन हत्या प्रकरणाचाही तपास 'एनआयए'कडे सोपवा, असे निर्देश ठाणे सत्र न्यायालयाने दहशतवादी विरोधी पथकाला (एटीएस) दिले आहेत. तसेच, केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार 'एनआयए' या प्रकरणाचा तपास करीत असताना 'एटीएस'ने यात हस्तक्षेप न करता आतापर्यंत गोळा केलेले पुरावे व दस्तावेजही 'एनआयए'कडे सुपूर्द करावेत, अशा सूचनाही न्यायालयाने केल्या आहेत.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकाप्रकरणी अटकेत असलेले निलंबित साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचा ठाण्यातील उद्योजक मनसुख हिरन यांच्या हत्येच्या कटात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दहशतवादी विरोधी पथकाला (एटीएस) सचिन वाझे यांचा ताबा हवा होता. गृह मंत्रालयाची सूचना मिळून तीन दिवस उलटूनही महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकानं तपास हस्तांतरित केला नसल्याची माहिती 'एनआयए'ने न्यायालयाला दिली होती. यानंतर आता ठाणे सत्र न्यायालयाने 'एटीएस'ला महत्त्वाचा आदेश दिला आहे. ५ मार्च या कालावधीत हिरन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत आढळून आल्यानंतर वाझेला अटक झाली. त्यानंतर विशेष 'एनआयए' न्यायालयाने वाझे यांना २५ मार्चपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. तेव्हा, एनआयएने ठाणे सत्र न्यायालयात अर्ज करून मनसुख हत्या प्रकरणही 'एनआयए'कडे वर्ग करण्याची विनंती केली होती. हत्याप्रकरणातील अटकेत असलेला बुकी नरेश गोर व बडतर्फ पोलीस विनायक शिंदे यांचाही ताबा 'एनआयए'ला द्यावा.
अग्रलेख
जरुर वाचा
पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची 'ममता', मिथून चक्रवर्तींचा हल्लाबोल

Mamata Banerjee पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारित कायद्यावरून रान पेटलं आहे. वक्फ सुधारित कायदा मंजूर झाल्यानंचर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंदूंसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आणि अभिनेते मिथून चक्रवर्तींनी केले आहे. बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होऊ देणार नसल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. यामुळे आपली व्होट बँक दुरावली जाऊ नये, हे लक्षात घेत कायद्या सुव्यवस्था न ठेवता बांग्लादेशप्रमाणे पश्चिम बांगलादेशची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मिथून चक्रवर्तींनी बारताच्या संविधानाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121