कारकिर्दीतील सर्वात जटील प्रकरणाचा गुंता सुटला : एटीएस डीआयजी

    21-Mar-2021
Total Views | 288

Shivdeep Lande_1 &nb
 
 
मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे खळबळ माजली असताना, दुसरीकडे मनसुख हिरेन हत्या प्रकारात एटीएसला मोठे यश प्राप्त झाले. याप्रकरणी २ जणांना अटक करण्यात आली. यावरून एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी एक विशेष फेसबुक पोस्ट करून माहिती दिली. या पोस्टमध्ये ते म्हणतात की, 'कारकिर्दीतील सर्वात जटील प्रकरणाचा गुंता सुटला आहे'
 
  
एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले की, "अतिसंवेदनशील मनसूख हिरेन हत्या प्रकरणाचा गुंता अखेर सुटला. मी आपल्या संपूर्ण एटीएस पोलीस दलातील सर्व सहकाऱ्यांना मनापासून सॅल्यूट करतो. ज्यांनी गेले काही दिवस दिवसरात्र एक करून, या प्रकरणाचा न्यायपूर्णरित्या छडा लावला. हे प्रकरण माझ्या कारकिर्दीतील आत्तापर्यंतच्या सर्वात कठीण प्रकरणांपैकी पैकी एक होते."
 
 
मनसुख हिरेन प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आलेला पोलीस विनायक शिंदे आणि बुकी असलेला नरेश गोर याला महाराष्ट्र एटीएसने अटक केली. एसच्या पथकाने बेड्या ठोकल्या. रविवारी ठाणे न्यायालयाने त्यांना ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अटक केलेला आरोपी नरेश गोर हा बुकी असुन त्यानेच सचिन वाझे यांना पाच ते सहा बेनामी सिमकार्ड पुरवले होते. तर, दुसरा आरोपी विनायक शिंदे हा लखनभय्या चकमकीप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेला बडतर्फ पोलीस कॉन्स्टेबल असुन पॅरोलवर बाहेर आला होता. त्यानेच हिरनला "तावडे" नावाने फोन केला होता. वाझे यांना अनेक प्रकरणात शिंदे याने मदत केल्याचेही समोर आले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121