(मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक सापडल्याच्या प्रकरणाचा तपास आता एनआयए आणि एटीएस करत आहे. अँटिलिया कार स्फोटक प्रकरणात आता पुण्याहून आलेली फॉरेन्सिक डिपार्टमेंटची टीम एनआयए ऑफिसमध्ये दाखल झाली आहे.)
ठाणे : वादग्रस्त निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटकपूर्व जामीन मिळू नये. यासाठी एटीएसने शुक्रवारी (दि.१९ मार्च) ठाणे न्यायालयात चारपानी पत्र सादर केले असून एटीएस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन वाझे यांचा मनसुख हिरन यांच्या हत्ये प्रकरणात किती सहभाग आहे आणि त्याबाबत तपासात काय समोर आले आले हे या ४ पानी पत्रात एटीएसने नमुद केले आहे.
दरम्यान, एटीएसने सादर केलेल्या या पत्रावर आपल्याला अभ्यास करायचा असून त्याकरता वेळ पाहिजे असा युक्तीवाद सचिन वाझे यांच्या वकील आरती कालेकर यांनी केला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्या अटकपुर्व जामिनावर पुढील सुनावणी ३० मार्च रोजी ठेवण्यात आली आहे. याविषयी सचिन वाझे यांच्या वकीलांनी माध्यमांशी संवाद साधताना ख्वाजा युनूस प्रकरणातही त्यांना अडकवण्यात आले होते आताही गोवले जात आहे, असा आरोप केला आहे.
तेव्हा,अद्याप वाझे यांच्याशी बोलणे झाले नसुन येत्या काही दिवसात त्यांच्याशी बोलून मगच ३० मार्च रोजी उत्तर देईन, असे स्पष्ट केले. दरम्यान, वाझे यांच्या बहिणीने इंटरव्हीजन याचिका दाखल केली आहे, मीडियावाले त्रास देतात, घरी येतात, त्यामुळे कोर्टाने राबोडी पोलिसांना यासंदर्भात लक्ष देण्याचे आदेश दिले आहेत.