‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या ‘अंचल’ कार्यालयास आरोग्यमंत्र्यांची सदिच्छा भेट

    06-Feb-2021
Total Views | 63
Rajesh Tope  _1 &nbs
 
 
मुंबई : ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या मुंबई शहर ‘अंचल’ कार्यालयास महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी सदिच्छा भेट दिली. बँकेच्या मुंबई शहर ‘अंचल’ कार्यालयाचे महाप्रबंधक व ‘अंचल’ प्रबंधक विजय कांबळे यांनी राजेश टोपे यांचे स्वागत केले.
 
 
याप्रसंगी कोरोना काळात राज्य सरकारने राबविलेल्या विविध महत्त्वपूर्ण योजनांबद्दल तसेच राज्यातल्या नागरिकांना सर्वोत्तमआरोग्य सुविधा पुरविल्याबद्दल बँकेच्यावतीने राजेश टोपे यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. 
 
 
याप्रसंगी वसुली शाखेचे महाप्रबंधक विवेक घाटे, प्रफुल्ल सोमण, अतुल जोशी, कुरूप, मेजर राधेश्याम, विजयाभिनंदन धुमाळ, नितीन बजाईत, रा. म. विश्वकर्मा, मुनीश गर्ग आणि अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘अंचल’ कार्यालयातील सीपीसी कमर्शिअल साहाय्यक महाप्रबंधक भगवान सुरूशे यांनी केले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121