पनवेल: राज्यातल्या वीजग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वेठीस धरून कारभार चालविण्याचे काम करणार्या महाविकास आघाडी सरकारचा पनवेल तालुका व शहर भाजपच्यावतीने जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. भिंगारी येथील महावितरण कार्यालयात शुक्रवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी ‘टाळे ठोको’ व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
दरमहा १०० युनिट वीजबिल माफी राज्य सरकारने जाहीर केली होती. त्यानुसार १२ महिन्यांचे १२०० युनिटचे वीजबिल माफ करा, तसेच शेतकर्यांची किमान पाच वर्षे वीजजोडणी कापू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉ. कविता चौतमोल, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्यासह भाजप कार्यकर्ते व वीजग्राहक सहभागी झाले होते.