२ डी इको, फीटल इको आणि लहान मुलांच्या हार्ट स्पेशालिस्टकडून कन्सल्टेशन या सेवा मिळणार मोफत
नवी मुंबई: रिलायन्स हॉस्पिटल नवी मुंबईने ०-१८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी निःशुल्क 'हृदय तपासणी' शिबिराचे आयोजन शुक्रवार, २६ फेब्रुवारी २०२१ रोजी केले आहे. हे शिबीर खासकरून अशा मुलांसाठी आहे ज्यांना यापूर्वी हृदय विकार झाला होता किंवा ज्यांची आधी सर्जरी झाली होती, ज्यांच्या हृदयामध्ये काही संशयास्पद स्थिती उत्पन्न झाली आहे किंवा ज्या मुलांना श्वसनाच्या समस्या आहेत अशी सर्व मुले या शिबिरात येऊन तपासणी करून घेऊ शकतात. यावेळी सकाळी दहा वाजल्यापासून पुढे मुलांचे हृदय विशेषज्ञ रुग्णांना तपासतील आणि प्रशिक्षित व्यावसायिक २ डी इको व फीटल इको या सेवा निःशुल्क पुरवतील.
मुलांमधील कार्डिओलॉजिकल समस्यांबाबत जागरूकता, माहिती वाढवणे व हृदयाच्या समस्या असलेल्या मुलांसाठी सर्वात चांगल्या उपचारांचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत याबाबत माहिती मिळवण्यात पालकांची मदत करणे हा या शिबिराचा उद्देश आहे.
या शिबिराच्या आयोजनामध्ये कोविड-१९ संदर्भात सर्व आवश्यक काळजी घेतली जाईल. शिबिराला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने कृपया मास्क घालणे अनिवार्य आहे. नोंदणी करण्यासाठी कृपया येथे संपर्क साधावा: श्री. संजय कोळेकर: ७३०४४६७७७३
शिबिराची वेळ: सकाळी दहा वाजल्यापासून पुढे
शिबिराचा पत्ता: रिलायन्स हॉस्पिटल, ठाणे-बेलापूर रोड,
कोपरखैराणे स्टेशनसमोर, धीरूभाई अंबानी नॉलेज सिटीच्या बाजूला, नवी मुंबई.