काँग्रेस नेत्यांचा पेट्रोल -डिझेल वाढीवरून अभिनेत्यांना ईशारा...
मुंबई: पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसने गुरुवारी राज्यभर आंदोलन सुरु केले आहे. यावेळी पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात भंडाऱ्यात आंदोलना पटोले यांनी म्हटले की, "मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात ट्विटरवरुन नेहमी टिवटिव करणारे आता पेट्रोल दरवाढीनंतर कुठे गेले आहेत? इंधन दरवाढीनंतरही चित्रपट सृष्टीतील अभिनेते शांत कसे? असा सवाल त्यांनी केला."
महाराष्ट्रात शुटिंग बंद पाडू असा इशारा पटोलेंनी दिला आहे. त्यावर भाजप नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांचा धमक्यांना जनता माफ करणार नाही असे म्हणत निशाणा साधला आहे. यावर भाजप आमदार राम कदम म्हणाले की, "अत्यंत प्रतिभावंत अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना काँग्रेस नेते धमक्या देत आहेत. या अभिनेत्यांचा चित्रपटाचे शूटिंग होऊ देणार नाही महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. या अभित्यांचा काय अपराध आहे. देश हिताच्या बाजूने बोलले तर अपराध झाला. विदेशात बसलेलं काही षडयंत्री लोक ,आपल्या भारत देशाला बदनाम करायला निघालेत. काँग्रेस नेत्यांनी लक्ष देऊन ऐकावं जनता तुम्हाला असं कराल तर माफ करणार नाही. देश हिताचं वागणाऱ्या लोकांपाठी संपूर्ण देश आहे. दिवसा ढवळ्या धमक्या देऊन नका महाराष्ट्र तुमच्या एकट्याची जहागीर नाही."