अयोध्या दौऱ्यानिमित्त विहिंपची राज ठाकरेंची 'मनसे' भेट

    01-Feb-2021
Total Views | 90

VHP_1  H x W: 0
 
 
मुंबई : प्रभू श्रीराम जन्मभूमी भव्य मंदिर निर्माण कार्यासाठी देशातील सर्व स्तरावरील जनतेला जोडण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्वहिंदू परिषदने हाती घेतले असून या कार्यात रामभक्त म्हणूनच घरोघरी जाऊन मंदिर कार्यासाठी निधी जमा करण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरु आहे. या अभियाना समाजातील नामांकित व्यक्तींच्याही भेटी घेतल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांची भेट त्यांच्या निवासस्थानी संघाचे कोंकण प्रांत संघचालक डॉ. सतीश मोढ, सिद्धिविनायक भाग संघचालक शिरीष केदारे ,विहिंप प्रांत सह मंत्री मोहन सालेकर, प्रांत सहमंत्री व प्रवक्ते श्रीराज नायर, प्रांत प्रचार प्रसार विभागाचे प्रशांत पळ यांनी सदिच्छा भेट घेतली.
 
 
 
त्यावेळी मनसेचे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर साहेब देखील उपस्थित होते. ही भेट अयोध्येत मंदिर निर्माणच्या कार्यासंबंधी राज साहेब यांना सविस्तर माहिती देण्यासंदर्भात होती त्याव्यतिरिक्त राज साहेबांच्या व उपस्थितांमध्ये अनेक प्रश्नांवर चर्चा व विचारांची देवाणघेवाण झाली. विशेष करून हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर तसेच शिक्षण व्यवस्था आणि भारतीय इतिहासाबद्दल राज साहेबानी त्यांचे मत मांडले तसेच सतीश मोढ यांनी संघ समाजात हितासाठी कश्या पद्धतीत कार्य करत आहे त्याविषयी काही माहिती दिली. विहिंपचे श्रीराज आणि मोहन सालेकर यांनी हिंदुत्वाच्या दृष्टीने विहिंपच्या प्रखर हिंदुत्ववादी कार्याबद्दल विचार मांडले. निधी समर्पणासंदर्भात विचारले असता राज साहेबांनी सांगितले, कि मी व माझे सहकारी अयोध्येचा दौरा करणार असून श्रीरामाचे दर्शन घेतल्यावर पक्षातर्फे तिथेच मंदिर निर्माणाकरिता निधी न्यासाचे महंत व विश्वस्त यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

ED काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्याशी संबंधित असणार्‍या कंपनीवर सक्तवसुली संचालनालयाने शनिवारी कार्यवाहीस सुरूवात केली. या मालमत्तेत दिल्ली, मुंबई आणि लखनऊमधील प्रमुख असणाऱ्या मालमत्तांचा समावेश आहे. काँग्रेसच्या संबंधित असणाऱ्या कंपनीशी नॅशनल हेराल्ड प्रकरणात असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनीकडे ६०० कोटी रुपयांहून अधिक किंमतीची मालमत्ता असल्याचे बोलले जात आहे. त्यापैकी देशाची राजधानी दिल्लीतून बहादूर शाह जाफर मार्गावरील प्रतिष्ठित हेराल्ड हाऊस आहे...

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bangladeshi राजस्थानातील अजमेर पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी घुसखोरी व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. व्हिसाशिवाय अवैधपणे बांगलादेशी व्यक्तीने भारतात घुसखोरी केली आणि त्याला तब्बल २३ वर्षानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित अवैधपणे घुसखोरी करणाऱ्याचे नाव हे मोहम्मद शाहिद असून त्याचे वय वर्षे हे ४० आहे. तो अजमेरमधील अंदर कोट परिसरात अवैधपणे वास्तव्य करत होता. एटीएएफने एकूण अकरा कारवायांमध्ये एकूण २१ घुसखोरांना पकडले आहे. दरम्यान, आता दर्गा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121