या लेखात आपण पारदर्शक जलरंगाबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केलाय, त्याला कारणही तसंच आहे. एक जलरंग चित्रकार आहे. राजकुमार सताबाती (Rajkumar Sthabathy) त्यांचं नाव! तामिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्यातील कुंभकोणम या मंदिरांच्या शहरात त्यांचं वास्तव्य आहे.
आज आपण ‘पारदर्शक जलरंगा’त काम करणाऱ्या एका कलाकाराच्या कलाप्रवासाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पुर्वी ‘जलरंग’, विशेषत: ‘पारदर्शक जलरंग’ या रंगमाध्यमाविषयीची माहिती जाणून घ्यायला हवी. जलरंगात, पोस्टर रंग (पोस्टर कलर), चिकणरंग (टेम्पर कलर) आणि स्थूल किंवा जाड जलरंगचित्रण (र्ॠेीरलहश) हे ‘अपारदर्शक जलरंग’ प्रकार आहेत. पारदर्शक जलरंगात पाण्याचं प्रमाण अधिक असतं आणि रंगद्रव्य (पिग्मेंट) प्रमाण आवश्यकतेनुसार घेतलं जातं. चित्रातीलसफेद वा पांढरा भाग हा कागदाचा पांढरा पृष्ठभागच उपयोगात आणला जातो. समजा रंगाची फिकट छटा मिळवायची असेल, तर रंगद्रव्यात पाण्याचं प्रमाण अधिक असतं. एकूणच पारदर्शक जलरंगात पाण्याच्या प्रमाणानुसार आणि रंगद्रव्यांच्या मिश्रणानुसार चित्रातील उठाव आणि गडदपणाचे परिणाम साधले जातात. रंगाचे ’पॅच’, ‘फ्लो’ (ओघळ), उठाव आणि गडदपणाचे परिणाम साधले जातात. ‘फ्लॅट’ अशा विविध शैलींमध्ये चित्रविषय पूर्ण केला जातो. मग, तो चित्रविषय निसर्गचित्रण असू शकेल वा व्यक्तिचित्रणही असू शकेल.
बऱ्याचदा पारदर्शक जलरंगातील कामांना दुय्यम स्थान देण्यात येते, पण इतिहासाचा मागोवा घेतला, तर पारदर्शक जलरंगामधील काम महाराष्ट्र आणि बंगालमध्ये फार पूर्वीपासून सुरू आहे. बंगाल स्कूलमधील गगनेंद्रनाथ ठाकूर, नंदलाल बोस, रामकिंकर बैज, गोपाल घोष, विनोद बिहारी मुखर्जी, गणेश पायन, श्यामल दत्त राय, समीर मोंडल, या काही महत्त्वाच्या ‘मास्टर्स’सह महाराष्ट्रातील आबालाला रहिमान, लक्ष्मण नारायण तस्कर, सावळाराम लक्ष्मण हळदणकर, गजानन सावळाराम हळदणकर, एम. आर. आचरेकर, एम. एस. जोशी, प्रल्हाद धोंड, गणपणतराव वडणगेकर, ग. ना. जाधव, दीनानाथ दलाल, अब्दुल रहीम, आपाभाई आळमेळकर, जांभळीकर नगरकर अशा पारदर्शक जलरंग चित्रकारांची परंपरा फार मोठी आहे.
विशेष म्हणजे, जलरंगातील कामाला कमी आयुष्य असतं, असं सांगणाऱ्यांसाठी वरील उल्लेखिलेल्या चित्रकारांच्या कलाकृती ज्या आजही ताज्यातवान्या वाटतात. अगदी अलीकडच्या काही दिवसांपूर्वी चितारलेल्या वाटतात. या लेखात आपण पारदर्शक जलरंगाबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केलाय, त्याला कारणही तसंच आहे. एक जलरंग चित्रकार आहे. राजकुमार सताबाती (ठरक्षर्ज्ञीारी डींहरलरींहू) त्यांचं नाव! तामिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्यातीलकुंभकोणम या मंदिरांच्या शहरात त्यांचं वास्तव्य आहे. या कुंभकोणमचा आणि ब्रह्मदेवाने धारण केलेल्या ‘कुंभ’ म्हणजे भांडे याच्याशी संबंध आहे. प्रलयानंतर सृष्टीवरील सर्व बीजांना या कुंभात घेऊन ब्रह्मदेवाने संरक्षण दिले. ज्यामुळे पृथ्वीची पुनर्स्थापना झाली. याच कुंभकोणमचा आणि आपला म्हणजे महाराष्ट्राचा अनन्यसाधारण संबंध आहे. तंजावर संस्थानाचे संस्थानिक महाराजासरफोजीराजे भोसले होते. मराठी राजा म्हणून त्यांचा चांगलाच ठसा तामिळनाडूत होता. स्वतः सरफोजीराजे भोसले हे कलाप्रिय आणि कलाकारांना प्रोत्साहन देणारे राजा म्हणून सुपरिचित होते. त्यांनीच राजा रवि वर्मा यांना प्रोत्साहन देऊन, युरोपियन, आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभागी होण्यास कलाकृती पाठवायला सांगितल्या होत्या.
कुंभकोणमला आपल्या ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’च्या स्थापनेच्या काळातच शासकीय कला महाविद्यालय सुरू करण्यात आले. १८६७चा काळ होता. जेव्हा त्या स्कूलला शासनाने राजाश्रय दिला. या कला महाविद्यालयातच, चित्रकार राजकुमार यांचं कला शिक्षण पूर्ण झालं. राजकुमार यांच्या जलरंग-लेपनाची शैली, जलरंगावरील हुकूमत ही अनुभव आहे, वाखाणण्यासारखी आहे. त्यांची व्यक्तीचित्रणे बघितली की, या लेखाच्या प्रस्तावनेतील ज्येष्ठ कलाकारांच्या उल्लेखात आलेल्या त्यांच्या शैली व तंत्राबरोबर, चित्रकार राजकुमार यांच्या चित्रशैलीची तुलना करता येते.
राजकुमार यांनी त्यांच्या व्यक्तीचित्रणात बाह्यसौंदर्यापेक्षा निखळ-नैसर्गिक सौंदर्यावर अधिक भर दिलेला आहे, असे दिसते. त्यांच्या व्यक्तीचित्रणात त्यांनी निवडलेले मॉडेल/मॉडेल्स हे बाह्यसौंदर्याहूनही नैसर्गिक भासतात. समोरच्या व्यक्तीचे वय, चेहऱ्यावरील भाव, डोक्यावरील केसांचे ड्रॉईंग, डोळ्यातील भाव, अंगावरील कपड्यांच्या घड्या या आणि अशा अनेक घटकांना राजकुमार यांच्या प्रत्येक व्यक्तिरेखेत चितारलेले आहे. ती पाहून पाहणाऱ्याला उत्तर गवसतं, आपलेपणा वाटतो, त्यांच्या कलाकृती पाहताना.
त्यांच्या रंगलेपनात उष्णरंग अर्थात लाल, पिवळा, तपकिरी क्वचित ठिकाणी इतरही रंग मात्र अत्यंत मोजक्या ठिकाणी ब्ल्यू, व्हाईट-ग्रीनही कधीमधी डोकावताना दिसतो. व्यक्तिचित्रणातील सर्व मांडणी ही शरीरशास्त्राचा सूक्ष्म अभ्यास करून केलेली दिसते. शरीरशास्त्रात वय, अंगकाठी, भावभावना आणि ओळख यांचा अभ्यास असणारा कलाकार फार विरलच असतो. राजकुमार यांच्या हातांनी टिपलेला, चितारलेला त्यांच्या डोळ्यांनी पाहिलेला असतो. मग, तो वयाने जरी पन्नाशी पार केलेला असला, तरी राजकुमार त्याला चिरतरूण करतात. आनंद, आळस, राग, द्वेष, हास्य, समाधान, हेवेदावे असे भाव त्यांनी अगदी ‘झिरो’ वा ‘डबल झिरो’ नंबरच्या ब्रशने जलरंगांच्या माध्यमातून चितारलेले दिसतात.
विशिष्ट रंगाचाच उपयोग करून सर्व तपशीलांसह बारकाव्यांसह व्यक्तिचित्रे चितारणे ही बाब सामान्य नाही. चित्रकार राजकुमार हे त्यापैकीच एक आघाडीचं नाव. राजकुमार यांची अनेक प्रदर्शने आणि पुरस्कार तामिळनाडूत सर्वश्रृत आहेत. जलरंगातील विशेषतः पारदर्शक जलरंगातील काम करणाऱ्या कलाकारांमध्ये राजकुमारचं अगदीच स्तराचं आहे. त्यांच्या कला प्रवासाला शुभेच्छा देतानाच सदिच्छा...!
- प्रा. डॉ. गजानन शेपाळ