डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा फुले रस्त्यावरील भोईरवाडी येथे असलेली युनियन बॅकेची शाखा बॅक व्यवस्थापनाने गोपी सिनेमा येथे सुरू केली आहे. भोईरवाडी येथील बॅकेची शाखा तळमजल्यावर असल्याने ज्येष्ठांसाठी ती सोयीची होती मात्र आताची शाखा ही अडचणींच्या जागेत असल्याने बॅकेच्या ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
भोईरवाडी येथील बॅकेची शाखा प्रशस्त जागेत होती. शाखेच्या बाहेर वाहने उभी करण्यासाठी सोय होती. एटीएमची व बॅक लॉकरची सुविधा देखील होती. ही भोईरवाडी येथील बॅकेची शाखा बंद करून बॅक व्यवस्थापनाने ती गोपी सिनेमा येथे स्थलांतरित केली आहे. ही नवीन जागेतील बॅक पहिल्या मजल्यावर आहे. बॅकेच बहुतांश ग्राहक हे ज्येष्ठ नागरिक, निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांना प्रत्येक वेळी बॅकेच्या पहिल्या माळ्य़ावर जाऊन व्यवहार करावे लागतात. ज्येष्ठ नागरिकांना जिना चढ-उतार करण्यासाठी ही त्रस होतो. या नवीन शाखेत एटीएमची सुविधा नाही. भोईरवाडी शाखेतील चार हजार ग्राहकांची खाती गोपी सिनेमा येथील शाखेत वर्ग करण्यात आली आहे. अनेक ग्राहकांना सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत. ग्राहकांना एकीकडे चांगली सुविधा मिळत नसतानाच दुसरीकडे त्यांच्या प्रश्नांना नीटशी उत्तरे दिली जात नाहीत अशी तक्रार ज्येष्ठ नागरिक असलेल्या ग्राहकांकडून केली जात आहे. या संदर्भात ज्येष्ठ नागरिकांनी भाजपाचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांच्याकडे ही गा:हाणो मांडले होते. त्यानंतर धात्रक यांनी बॅक व्यवस्थापनाशी संपर्क साधला होता. त्याला आता दीड महिने उलटले आहे. मात्र बॅक ग्राहकांची समस्या जैसे थे च आहे.
ग्राहकांनी बॅकेच्या विभागीय महाव्यवस्थापक रूतू नायर यांची भेट घेतली असता हा प्रश्न स्थानिक अधिका:यांशी बोलून सोडविण्यात येईल. हे प्रकरण वरिष्ठांकडे पाठविण्यात आले आहे असे आश्वासन ग्राहकांच्या शिष्टमंडळाला दिले होते. आश्वासनानंतर ही आतार्पयत नवीन जागेतच शाखा सुरू आहे. या परिसरात बॅकेची अन्य कोणतीही शाखा नसल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.