कोलकाता : मदर टेरेसा यांच्याशी संलग्न 'मिशनरीज ऑफ चॅरिटी'च्या सर्व प्रकारची बँक खाती केंद्र सरकारने सील केली आहेत. नाताळनिमित्त केलेल्या कारवाईबद्दल ममता बॅनर्जी यांनी चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत हा प्रकार धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.
त्यांच्या २२ हजार कर्मचाऱ्यांच्या जेवणाचं काय, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. मिशनरीज ऑफ चॅरिटीज् तर्फे या प्रकारावर कुठलीही प्रतिक्रीया देण्यात आलेली नाही. गृहमंत्रालयाने या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यात 'मिशनरीज ऑफ चॅरिटी'तर्फे एसबीआयला सांगत स्वतःच आपली खाती गोठविण्यास सांगितली आहेत, असे म्हटले आहे.
मंत्रालयाने म्हटल्यानुसार, संस्थेने FCRA पूर्ननोंदणी करताना काही त्रुटी ठेवल्या होत्या. त्यामुळे नुतनीकरणाला मंजूरी मिळालेली नाही. FCRA रजिस्ट्रेशन ३१ डिसेंबरपर्यंतच वैध होते. गृह मंत्रालयाने यात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप केलेला नाही. कुठल्याही खाती गोठविण्याच्या प्रकीयेत आमचा हात नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Shocked to hear that on Christmas, Union Ministry FROZE ALL BANK ACCOUNTS of Mother Teresa’s Missionaries of Charity in India!
Their 22,000 patients & employees have been left without food & medicines.
While the law is paramount, humanitarian efforts must not be compromised.
याच महिन्यात मकरपुरा पोलीस ठाण्यात मिशनरीज ऑफ चॅरिटीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारकर्त्याच्या आरोपांनुसार, या संघटना शेल्टर होममध्ये राहणाऱ्या मुलींना क्रॉस परिधान करण्यासाठी आणि बायबल वाचण्यासाठी जबरदस्ती करत आहेत.
No revision application received from Missionaries of Charity for review of refusal of FCRA renewal: Home Ministry
मदर टेरेसा यांनी केली होती मिशनरीज ऑफ चॅरिटीची स्थापना
मदर टेरेसा यांनी १९५० मध्ये मिशनरीज ऑफ चॅरिटीज् या संस्थेची स्थापना केली होती. मदर टेरेसा या एक रोमन कैथोलिक नन होत्या. त्यांनी आपल्या आयुष्यातील बराचसा काळ कोलकाता येथे मिशनरीजच्या कामात घालविला. सप्टेंबर १९९७ मध्ये त्यांचे निधन झाले. सप्टेंबर २०१६ मध्ये पोप फ्रान्सिस याने त्यांना सेंटचा दर्जा दिला होता.