ईस्ट ऑर वेस्ट इंडिया इज बेस्ट

    26-Dec-2021
Total Views | 79
 
Ashes.jpg_1
 
 
 
क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध मालिकांपैकी एक म्हणून ओळख असलेली ‘दि अ‍ॅशेस’ मालिका सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर सुरू आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड या दोन्ही बलाढ्य देशांच्या संघामध्ये कसोटी मालिका रंगतदार होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा सध्या फोल ठरत असल्याचे चित्र आहे.
 
 
मालिकेतील पहिले दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाने जिंकण्यात यश मिळविले आहे. इंग्लंडच्या खेळाडूंकडून लौकिकाला साजेशी कामगिरी होत नसल्याचे चित्र आहे. तिसर्‍या कसोटी सामन्यातही इंग्लड पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत असून येथून कसोटी मालिकेत पाहुण्यांचा संघ पुनरागमन करेल, अशी शक्यता दिसत नाही. इंग्लंडचा संघ हा क्रिकेट विश्वातील बलाढ्य संघांपैकी एक म्हणून ओळखला जातो. ऑस्ट्रेलियाच्या संघाला तो कडवी झुंज देईल, अशी शक्यता क्रिकेटविश्वातील अनेक तज्ज्ञांनी वर्तविली होती. मात्र, सध्या सुरू असलेल्या मालिकेदरम्यान प्रत्यक्षात तसे काही पाहावयास मिळत नाही. ऑस्ट्रेलियाचाच संघ इंग्लंडपेक्षा वरचढ असल्याचे पाहावयास मिळत आहे. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत निर्भेळ यश मिळविण्याचे ध्येय ऑस्ट्रेलियाचे आहे. ऑस्ट्रेलिया हे ध्येय साध्य करेल की नाही, हे येणारी वेळच ठरवेल. पण, घरच्या मैदानात रूबाब मिरवणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या संघाचे गर्वहरण करण्याचे काम केवळ भारतीय संघानेच केले होते. २०२१ या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात झालेल्या चार कसोटी सामन्यांच्या ‘बॉर्डर-गावस्कर’ कसोटी क्रिकेट मालिकेत २-१ अशा फरकाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर धूळ चारत कसोटी मालिका जिंकण्याची किमया भारतीय क्रिकेट संघाने साधली होती. ही मालिका ऑस्ट्रेलियाकडून भारत ४-०च्या फरकाने पराभूत होईल, अशी अटकळे बांधत त्यावेळी काही तज्ज्ञ क्रिकेट मंडळींनी भारताला डिवचण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, प्रत्यक्षात भारतीय संघाने या मालिकेत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. ऑस्ट्रेलियाला गाबा मैदानावर गेल्या ३२ वर्षांपासून कोणी पराभूत करू शकले नव्हते. मात्र, याही मैदानावर भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत नव्या विक्रमाची नोंद केली. इंग्लंडच्या संघाला जेथे एका विजयासाठी संघर्ष करावा लागत आहे, तेथे वर्षभरापूर्वी भारतीय संघाने मालिका विजय साकारत इतिहास रचला होता. म्हणून ‘ईस्ट ऑर वेस्ट इंडिया इज बेस्ट’.


टीका नको; पाठिंबा हवा!


संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) धरतीवर झालेल्या ‘टी-२०’ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारतीय पुरुष क्रिकेट संघाची कामगिरी लौकिकाला साजेशी झाली नाही. तत्कालीन भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि ‘टी-२०’ संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीसह संपूर्ण भारतीय क्रिकेट संघावर कडाडून टीका झाली. यानंतर ‘टी-२०’ आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाच्या मुद्द्यावरूनही भारतीय संघातील वातावरण ढवळून निघाले. या सर्वांतून सावरत आता भारतीय संघ पुढील वाटचाल करत आहे. नव्या मुख्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ समाधानकारक कामगिरी करत आहे. त्यामुळे या संघाला आता पुन्हा आपले तेच वलय प्राप्त करून देण्यासाठी नव्या प्रेरणेची गरज आहे. नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे भारतीय संघाला उत्तम मार्गदर्शन करतच आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभवी आणि नवखे असे दोन्ही खेळाडू सध्या उत्तम कामगिरी करत आहेत. नुकत्याच न्यूझीलंडविरूद्ध पार पडलेल्या दोन्ही मालिकांमध्ये (टी-२० आणि कसोटी) भारतीय संघाने उत्तम कामगिरी करत ते सिद्ध केले. सध्या दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेतही भारतीय संघ उत्तम कामगिरी करेल, अशी आशा सर्वांना आहे. रविवारपासून सुरू झालेल्या सेंच्युरियन येथील पहिल्या कसोटी सामन्यात सलामीवीर फलंदाजांनी शतकीय भागीदारी रचत परदेशी धरतीवरही उत्तम प्रदर्शन करण्यास भारतीय संघ सक्षम आहे, हे दाखवून दिले. या दौर्‍यात दक्षिण आफ्रिकेला मालिका नमवण्यात भारतीय संघ जर यशस्वी झाल्यास भारत आणखी एका नव्या इतिहासाची नोंद करेल. भारतीय संघ पुन्हा लय प्राप्त करेल, यात शंकाच नाही. मात्र, त्यांना सध्या गरज आहे ती म्हणजे प्रेरणेची. भारतीय संघाने उत्तम कामगिरी केल्यानंतर अनेक चाहत्यांकडून प्रशंसा केली जायची. परंतु, अलीकडच्या काळात त्याच चाहत्यांकडून टीकेचा भडिमार होत असल्याचे पाहायला मिळाले. संघाने निराशाजनक कामगिरी केली, हे वास्तव आहेच. परंतु, आता त्यातून सावरून भारतीय संघ नव्याने उत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्या दिशेने संघाची वाटचालही होताना दिसत आहे. त्यामुळे आता या संघाच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.


- रामचंद्र नाईक
अग्रलेख
जरुर वाचा
सामर्थ्य-परमार्थाचा मेळ म्हणजे मधु मंगेश कर्णिक!

सामर्थ्य-परमार्थाचा मेळ म्हणजे मधु मंगेश कर्णिक!

"कोकणी माणसाचे भावविश्‍व मराठी साहित्यामध्ये योग्य शब्दात चितरणारे मधु मंगेश कर्णिक म्हणजे सामर्थ्य आणि परमार्थाचा अनोखा संगम आहे" असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या ९५व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याच्या भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, अध्यक्ष ..

पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर: मुख्यमंत्री

पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर: मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन आज मुंबईत दाखल झाले. मंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121