Custom Heading

पाकिस्तानात सापडले २,३०० वर्ष जुने मंदिर आणि बऱ्याच दुर्मीळ मूर्ती, नाणी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2021
Total Views |
pakisthan _1  H



कराची - पाकिस्तानमध्ये उत्खननादरम्यान एक दुर्मीळ २,३०० वर्षे जुने बौद्ध मंदिर सापडले आहे. मंदिराव्यतिरिक्त उत्खननादरम्यान २,७०० हून अधिक कलाकृती देखील सापडल्या आहेत. पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम प्रदेशातील स्वात प्रांतात पाकिस्तान आणि इटलीच्या पुरातत्वशास्त्रज्ञांच्या संयुक्त पथकाने याचा शोध लावला आहे. हे मंदिर पाकिस्तानातील बौद्ध काळातील सर्वात जुने मंदिर असल्याचे सांगितले जात आहे.
 
 
हे मंदिर खैबर पख्तुनख्वा प्रांतातील स्वात जिल्ह्यातील बरीकोट तहसीलमधील बाजीरा शहरात सापडले आहे. या संदर्भात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “पाकिस्तान आणि इटालियन पुरातत्वशास्त्रज्ञांनी वायव्य पाकिस्तानमधील एका ऐतिहासिक ठिकाणी संयुक्त उत्खननादरम्यान २,३०० वर्षे जुने बौद्ध काळातील मंदिर शोधून काढले आहे. यासोबतच इतर मौल्यवान कलाकृतीही जप्त करण्यात आल्या आहेत. स्वात जिल्ह्यात आढळणारे हे मंदिर पाकिस्तानातील तक्षशिला येथील मंदिरांपेक्षा जुने आहे. मंदिराव्यतिरिक्त, पुरातत्वशास्त्रज्ञांना सापडलेल्या २,७०० बौद्ध कलाकृतींमध्ये नाणी, अंगठ्या, भांडी आणि ग्रीसचा राजा मिनंदर याच्या काळातील खरोष्टी भाषेत लिहिलेल्या साहित्याचा समावेश आहे. स्वात जिल्ह्यातील बाजीरा या ऐतिहासिक शहरात उत्खननादरम्यान आणखी पुरातत्व स्थळे सापडतील, असे इटालियन तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
 
 
 
संग्रहालय आणि पुरातत्व विभागाचे संचालक डॉ.अब्दुस समद यांनी सांगितले की, स्वातमधील बरीकोटचे बाजीरा शहर तक्षशिलापेक्षा जुने आहे. येथे प्रमुख इटालियन विद्यापीठे आणि खैबर पख्तुनख्वा पुरातत्व विभागातील पीएचडी विद्यार्थी बाझिरा शहरातील ऐतिहासिक स्थळांच्या उत्खननाचे काम करत आहेत. डॉ समद यांनी खुलासा केला की, खैबर पख्तुनख्वा सरकारने चौदा पुरातत्व स्थळे खरेदी केली आहेत आणि तेथे उत्खननाचे काम सुरू आहे. ते म्हणाले की, बाजीरा शहरात नुकत्याच सापडलेल्या कलाकृतींवरून हे सिद्ध झाले आहे की स्वात हे सहा ते सात धर्मांचे पवित्र ठिकाण आहे. यादरम्यान पाकिस्तानमधील इटालियन राजदूत आंद्रे फेरारिस म्हणाले की, पाकिस्तानमधील पुरातत्व स्थळे जगातील विविध धर्मांसाठी खूप महत्त्वाची आहेत. ते म्हणाले की, इटालियन पुरातत्व मिशन खैबर पख्तूनख्वा पुरातत्व विभागाच्या सहकार्याने गेल्या सत्तर वर्षांपासून पाकिस्तानमधील पुरातत्व स्थळांचे संरक्षण आणि उत्खनन करत आहे.
 
 
 
२०२० च्या सुरुवातीला पाकिस्तानच्या स्वात जिल्ह्यात उत्खननादरम्यान पुरातत्वशास्त्रज्ञांना विष्णू मंदिराचे अवशेष सापडले होते. या मंदिराच्या अवशेषांवरून असे दिसून येते की, हे किमान १ हजार वर्षे जुने हिंदू मंदिर होते. पाकिस्तान आणि इटलीच्या पुरातत्वशास्त्रज्ञांच्या संयुक्त पथकानेही या मंदिराचा शोध लावला होता. त्यावेळी खैबर पख्तुनख्वा पुरातत्व विभागाचे अधिकारी फझले खालिक यांनी हे मंदिर भगवान विष्णूचे असल्याचे सांगितले होते. हिंदू साम्राज्याच्या काळात हे मंदिर बांधण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. त्याचवेळी, यावर्षी जुलै महिन्यात याच परिसरात भगवान बुद्धाची एक मूर्ती सापडली होती, जी कामगारांनी फाडून टाकली होती.
@@AUTHORINFO_V1@@

Custom Heading

जरुर वाचा
२१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर; चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित

२१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर; चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'या' नाटकात दिसणार मुख्य भूमिकेत!

एखादा कलाकार कितीही मोठा झाला, कितीही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले, मसालापटांपासून चरित्रपटांपर्यंत आभाळाएवढ्या उंचीच्या व्यक्तिरेखा साकारल्या तरी रंगभूमीची ओढ कधीच संपत नाही. कोणताही हाडाचा कलाकार ठराविक वेळेनंतर पुन्हा तो रंगभूमीकडे वळतो, इथे होणाऱ्या तिसऱ्या घंटेसोबत व्यक्तिरेखेत शिरतो, प्रयोगांमागून प्रयोग करत त्यातच रमतो आणि जिवंत कला पाहण्याचा अनुभव रसिकांना देताना स्वत:लाही धन्य मानू लागतो. चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकरही याला अपवाद नाहीत. मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ..

सर्वसमावेशक विकासासाठी पतपेढी चळवळ आवश्यकच : विद्याधर अनास्कर

सर्वसमावेशक विकासासाठी पतपेढी चळवळ आवश्यकच : विद्याधर अनास्कर

2025 हे वर्ष संयुक्त राष्ट्राने ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. याच सहकार क्षेत्राचे जाळे महाराष्ट्रात खूप खोलवर रुजले आहे. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे सहकारी वित्तीय संस्था आणि या वित्तीय संस्थांमधील महत्त्वाचा भाग म्हणजे, सहकारी पतसंस्था म्हणजेच सहकारी पतपेढी. सर्वसामान्य माणसांच्या जवळच्या आणि त्यांच्या अर्थकारणातही या पतसंस्थांना आजही जिव्हाळ्याचे स्थान आहे. पण, आज याच पतसंस्थांची चळवळ ही काही गैरप्रकारांमुळे संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. त्यानिमित्ताने पतसंस्थांच्या अर्थकारणाचा, ..