मुंबईतील शाळा सुरु करा ; महापालिका प्रशासनाचे मुख्याध्यापकांना आदेश

पालक अनभिज्ञ असल्याने संभ्रम कायम

    15-Dec-2021   
Total Views | 109
 
mumbai school_1 &nbs
 
 
 
मुंबई : देशभरात मागील दीड ते दोन वर्षांपासून थैमान घातलेल्या कोरोना संसर्गामुळे देशातील शाळांना कुलूप लागले होते. मात्र, मागील काही दिवसांपासून देशातील कोरोनास्थितीचा आलेख कमी होत असून त्या पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये शाळा सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर मुंबईतील शाळा सुरु करण्याच्या संदर्भात मुंबई महापालिका प्रशासनातर्फे मंगळवार, दि. १४ डिसेंबर रोजी परिपत्रक काढण्यात आले आहे. मात्र,शाळा सुरु होण्याच्या संदर्भात प्रशासनातर्फे कुठलीही माहिती पालकांना देण्यात आली नाही, अशी तक्रार अनेक पालकांनी केली आहे. मात्र, दुसरीकडे मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी मुंबईतील शाळा आज दि. १५ डिसेंबरपासूनच सुरु होणार असून शाळेबाबत कुठलाही संभ्रम पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी बाळगू नये, असे स्पष्ट केले आहे.
 
 
"15 डिसेंबरपासून शाळा सुरु करा, हे याआधीच शाळांना सुचित केले होते. मात्र तरीदेखील काही शाळांनी आजतागायत पाल्याला शालेत पाठविण्याविषयी पालकांना कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. ही बाब गंभीर असून पुन्हा नव्याने सूचना देण्यात येतील.", असे मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी म्हटले आहे.
 
 
दरम्यान, बुधवार, दि. १५ डिसेंबरपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करण्याच्या सूचना मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिल्या आहेत. मुंबईतील प्राथमिक शाळा सुरु करण्याचा निर्णय महापालिकेतर्फे मागील ३० नोव्हेंबर रोजी घेण्यात आला होता. मात्र शाळा सुरु होण्यास एक दिवस शिल्लक असताना शाळांकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाही. त्यामुळे पालकवर्गात संभ्रमाचं वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
 

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121