मुंबईत २२५ कोरोनाबाधितांची नोंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2021   
Total Views |
 
corona_1  H x W
 
 
 
मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मंगळवार , दि. १४ डिसेंबर रोजी मुंबई शहरात २२५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर २०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ७४४९९० वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे.
 
 
मंगळवारी मुंबईत झालेल्या एका कोरोनाबाधिताच्या मृत्यूनंतर शहरातील एकूण मृतांची संख्या १६,३६० झाली असून शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या १,७६९ इतकी आहे. रुग्ण दुपटीचा दर २,५६३ दिवसांवर जाऊन ठेपला आहे. शहरातील एकूण १५ इमारतींना महापालिका प्रशासनातर्फे सील करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
 
 
मुंबईत झालेल्या एकूण चाचण्या - १,२९,४८,६८४
१४ डिसेंबर रोजी मुंबईत झालेल्या चाचण्या - ३१५५२
@@AUTHORINFO_V1@@
जरुर वाचा
नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? ..