Custom Heading

राहुल गांधींची शिवाजी पार्कवरील सभा अखेर रद्द

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2021   
Total Views |
 
RAHUL-GANDHI-2_1 &nb
 
 
 
मुंबई : अखिल भारतीय काँग्रेसचे माही अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची मंगळवार, दि. २८ डिसेंबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर होणार सभा अनेक घडामोडींनंतर अखेर रद्द करण्यात आली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी या बाबत मंगळवार, दि. १४ डिसेंबर रोजी माध्यमांशी संवाद साधत खुलासा केला. तत्पूर्वी या सभेसाठी काँग्रेसतर्फे न्यायालयात करण्यात आलेली याचिका देखील पक्षातर्फे मागे घेण्यात आली होती. ज्यावरून अनेक चर्चा आणि तर्क वितर्क लढविले जात होते. मात्र, अखेर भाई जगताप यांनी यावर खुलासा दिला आहे.
 
 
भाई जगताप म्हणाले की, 'सध्या देशभरासह महाराष्ट्र आणि मुंबईत ओमायक्रॉन या नव्या विषाणूचे रुग्ण आढळत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारतर्फे महाराष्ट्रात काही निर्बंध लावण्यात आले असून त्या नियमांचे पालन म्हणून काँग्रेसचा हा मेळावा रद्द करण्यात येत आहे. राहुल गांधी यांची सभा मुंबईत आणि विशेष म्हणजे शिवाजी पार्क येथे व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. त्याचा पाठपुरावा देखील आम्ही सरकारकडे अनेक दिवस केला, मात्र सरकारतर्फे कुठलाही प्रतिसाद न आल्याने न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय पक्षातर्फे घेण्यात आला होता. सध्या जरीची हा मेळावा रद्द करण्यात येत असला तरी राहुल गांधी यांचा पुढील मेळावा आणि पुढील सभा ही शिवाजी पार्क येथेच होईल,' असे भाई जगताप यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला नाव न घेता सूचित केल्याचे बोलले जात आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@

Custom Heading

जरुर वाचा